जळगावमध्ये ज्वेलर्सवर ४० लाखांचा दरोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 12:33 IST2024-05-21T12:32:37+5:302024-05-21T12:33:54+5:30

जळगावमध्ये महेंद्र कोठारी यांचे सौरभ ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सोमवारी पहाटे तीन दुचाकींवर तोंडाला रुमाल बांधून सहा दरोडेखोर दुकानाच्या मागच्या बाजूने आले.

Robbery of 40 lakhs on jewelers in Jalgaon | जळगावमध्ये ज्वेलर्सवर ४० लाखांचा दरोडा

जळगावमध्ये ज्वेलर्सवर ४० लाखांचा दरोडा

जळगाव : सराफ बाजार परिसरातील सौरभ ज्वेलर्स या दुकानात सोमवारी पहाटे सशस्त्र दरोडा टाकून सहा जणांनी चाकूचा धाक दाखवत ४० लाख रुपयांचा मुद्देमाल लुटला. पोलिस वाहनाच्या सायरनचा आवाज आल्याने चोरट्यांनी पळ काढला, त्यामुळे इतर दागदागिने सुरक्षित राहिले. 

जळगावमध्ये महेंद्र कोठारी यांचे सौरभ ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सोमवारी पहाटे तीन दुचाकींवर तोंडाला रुमाल बांधून सहा दरोडेखोर दुकानाच्या मागच्या बाजूने आले. त्यांनी दरवाजाचे लोखंडी चॅनेल गेटचे कुलूप कटरने तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानात झोपलेल्या दोन जणांना चाकूचा धाक दाखवत आतील कुलूप तोडून अंदाजे ४० लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड, असा मुद्देमाल लुटून नेला. पोलिस सायरनचा आवाज आल्याने दरोडेखोर पसार झाले. दुकानातील सीसीटीव्ही ७ मे पासून बंद होते, परंतु बाहेरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दुचाकीवर आलेले सहा दरोडेखोर कॅमेऱ्यात कैद झाले.

Web Title: Robbery of 40 lakhs on jewelers in Jalgaon