केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा; कर्मचाऱ्यांना मारहाण केली, लाखो रुपये पळवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 09:48 IST2025-10-10T09:43:19+5:302025-10-10T09:48:12+5:30
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा; कर्मचाऱ्यांना मारहाण केली, लाखो रुपये पळवले
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्मचाऱ्यांना मारहाण करत १ लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांनी पळवली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील करकी गावाजवळील पंपावर हा दरोडा पडला आहे. मुंबई-नागपूर महामार्गावरील तीन पेट्रोल पंपावर हा दरोडा पडला आहे. पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे.
"क्या बड़ा तो सबसे दम बड़ा, राग आलाकी...", गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
मुक्ताईनगर तालुक्यातील करकी गावाजवळ ही घटना घडली. रात्री साडे बाराच्या दरम्यान ही घटना घडली. मुंबई-नागपूर महामार्गावरील तीन पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला आहे. यातील एख पंप केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा असल्याची माहिती समोर आली आहे. कर्मचारी काम करत असताना रात्री १२ वाजता चार ते पाच जण आले, यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. शस्त्रांचा धाक दाखवली आणि पैसे घेऊन फरार झाले.
पोलिसांनी रात्रीच जिल्ह्यात नाकाबंदी केली. या दरोड्यामध्ये पाच आरोपींचा समावेश होता. यामधील तीन संशयीत आरोपींना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल पहाटेच्या सुमारास पाच दरोडेखोर मोटरसायकलवरून आले. यावेळी या दरोडेखोरांनी पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करत त्यांच्याकडील रोकड लुटून नेली. दरोडेखोरांनी सुमारे एक लाख रुपयांची रोकड लंपास केली. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्हीची तोडफोड केली.