शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार! सप्टेंबरचे १५०० रुपये लवकरच मिळणार, तारीख आली समोर
2
फिलीपिन्समध्ये ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, भयंकर त्सुनामीचा इशारा
3
"क्या बड़ा तो सबसे दम बड़ा, राग आला की...", गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
4
केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा; कर्मचाऱ्यांना मारहाण केली, लाखो रुपये पळवले
5
Stock Market Today: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजाराचं सुस्त ओपनिंग; निफ्टीही घसरला, NBFC-बँकिंग शेअर्समध्ये तेजी
6
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
7
जर्मनीपासून एक पाऊल दूर! ट्रम्प यांच्या निकटवर्तीयानंही मान्य केली भारताची ताकद, भागीदारीसाठी हात पुढे
8
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
9
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
10
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
11
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
12
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
13
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
14
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
15
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
16
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
17
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
18
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
19
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
20
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्र्यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर दरोडा, दोन जणांना मारहाण, एक लाखाची रोकड लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 00:21 IST

Jalgaon Crime News: केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या रक्षा ऑटो फुएल्स या मुक्ताईनगरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला. यात दोन कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करीत तोडफोड करण्यात आली. जवळपास एक लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. ही थरारक घटना राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास घडली.

- विनायक वाडेकरमुक्ताईनगर (जि.जळगाव) - केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या रक्षा ऑटो फुएल्स या मुक्ताईनगरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला. यात दोन कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करीत तोडफोड करण्यात आली. जवळपास एक लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. ही थरारक घटना राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास घडली.

प्रकाश माळी व दीपक खोसे अशी मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या पेट्रोल पंपावर दोन दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी अचानक या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांच्या डोक्याला बंदूक लावत गल्ल्यातील आणि कर्मचाऱ्यांकडे असलेली जवळपास एक लाख रुपयांची रोकड लंपास केली. तसेच ऑफिसमधील संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तोडफोड करण्यात आली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ हे पथकासह घटनास्थळी पोहचले. दरोडेखोर बोहर्डी गावाच्या दिशेने पसार झाल्याची माहिती मिळताच पोलिस पथक त्या दिशेने रवाना झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Robbery at Minister Khadse's Petrol Pump: Employees Assaulted, Cash Stolen

Web Summary : Minister Raksha Khadse's petrol pump in Muktainagar was robbed. Five individuals assaulted two employees, stealing approximately ₹1 lakh. The robbers damaged computers, printers, CCTV, and other electronic equipment before fleeing towards Bohardi village. Police are investigating the incident.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव