मालधक्क्याच्या अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST2021-02-05T05:59:41+5:302021-02-05T05:59:41+5:30

शिवाजीनगरवासीयांना पर्यायी रस्ता म्हणून रेल्वे प्रशासनातर्फे पिंप्राळा रेल्वे गेटकडून मालधक्क्याच्या अंतर्गत रस्तामार्गे सुरत गेटकडे जाण्यासाठी परवानगी दिली होती; ...

Road work completed under Maldhakka | मालधक्क्याच्या अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण

मालधक्क्याच्या अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण

शिवाजीनगरवासीयांना पर्यायी रस्ता म्हणून रेल्वे प्रशासनातर्फे पिंप्राळा रेल्वे गेटकडून मालधक्क्याच्या अंतर्गत रस्तामार्गे सुरत गेटकडे जाण्यासाठी परवानगी दिली होती; तसेच वाहतुकीसाठी या रस्त्याची दुरुस्ती करण्याचेही आश्वासन रेल्वेतर्फे देण्यात आले होते; मात्र रेल्वे प्रशासनाने वर्षभरानंतर या कामासाठी उपलब्ध करून दिलेला निधीही अपूर्ण पडल्यामुळे हे काम अर्ध्यावरच रखडले होते. त्यानंतर रेल्वेने पुन्हा या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी कामाला पुन्हा सुरुवात झाली होती.

सुरुवातीपासून हे काम संथ गतीने असल्यामुळे नागरिकांकडून होत असलेल्या गैरसोयीबाबत तक्रारी करण्यात येत होत्या. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन, तातडीने संबंधित मक्तेदाराकडून हे काम पूर्ण करून घेतले. त्यामुळे शुक्रवारपासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Web Title: Road work completed under Maldhakka