समाजवादाच्या संस्कारांनी कवी वसंत बापटांचे कवित्व अक्षय केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:16 IST2021-09-13T04:16:27+5:302021-09-13T04:16:27+5:30

ते महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा-चाळीसगाव तर्फे कवी प्रा. वसंत बापट जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित एकदिवसीय व्याख्यानात लक्षवेधी कविवर्य वसंत ...

The rites of socialism immortalized the poetry of the poet Vasant Bapat | समाजवादाच्या संस्कारांनी कवी वसंत बापटांचे कवित्व अक्षय केले

समाजवादाच्या संस्कारांनी कवी वसंत बापटांचे कवित्व अक्षय केले

ते महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा-चाळीसगाव तर्फे कवी प्रा. वसंत बापट जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित एकदिवसीय व्याख्यानात लक्षवेधी कविवर्य वसंत बापट या विषयावर बोलत होते.

याप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य व प्राचार्य तानसेन जगताप, मसाप विश्वस्त मंडळ अध्यक्ष डॉ. सुनील राजपूत, कार्याध्यक्ष मनोहर ना. आंधळे, उपाध्यक्ष प्रा. अशोकराव वाबळे, प्रमुख कार्यवाह गणेश आढाव हे उपस्थित होते.

पुढे वक्ते कवी आंधळे म्हणाले की, तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीने कवी बापटांना अस्वस्थ केले. त्यांनी या चळवळीत उडी घेतली. ब्रिटिश शासनाने सर्व अंदोलकांना अटक केली. त्याप्रसंगी ना. ग. गोरे, एस. एम. जोशी आणि पूज्य साने गुरुजींसारखे थोर स्वातंत्र्य सेनानी भेटलेत. तद्वतच तारुण्यप्रारंभी प्रेमकविता लिहिणारे व नाट्यकर्मी असलेले बापटांचे अवघे आयुष्यच समाजवादी देशभक्तीमय विचारांचे अधिष्ठान झाले.

एकूण अडीच तास चाललेल्या या मसाप विचारमंथन यज्ञात रसिक श्रोते भारावून गेलेत. प्रारंभी प्रमुख कार्यवाह गणेश आढाव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यवाह बी. एल. ठाकरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर कार्याध्यक्ष कवी मनोहर आंधळे यांनी प्रास्तविक केले. आभार प्रा. अशोकराव वाबळे यांनी व्यक्त केलेत आणि मानपत्राचे वाचन कार्यकारिणी सदस्य रामचंद्र गोसावी यांनी केले.

याप्रसंगी स्नेहल सापनर या चिमुरडीने कवी वसंत बापट लिखित ‘सदैव सैनिका पुढेच जायचे’ हे सैनिक प्रेरणागीत अत्यंत सुश्राव्य चालीत सादर करून उपस्थितांचे मन पुलकित केले. सूत्रसंचालन ॲड. सुषमा पाटील यांनी केले.

कार्यक्रमात उत्तमराव काळे, प्रा. जयसिंग बागुल आणि डॉ. विनोद कोतकर, डॉ. चेतना कोतकर, प्रा. पी. एस. चव्हाण, रमेश पोतदार, शालिग्राम निकम, अशोक ब्राम्हणकार, प्रतिभा बागुल , राकेश बोरसे, लीलावती जगताप उपस्थित होते.

Web Title: The rites of socialism immortalized the poetry of the poet Vasant Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.