सोन्याची दरवाढ सुरूच; आज पुन्हा तोळ्यामागे ११ हजार रुपयांनी महागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 12:52 IST2026-01-30T12:52:56+5:302026-01-30T12:52:56+5:30

जळगावच्या सराफ बाजारात सोने प्रति तोळा एक लाख ७६ हजार रुपयांवर

Rise in gold prices continues today it became more expensive by Rs 11000 per tola | सोन्याची दरवाढ सुरूच; आज पुन्हा तोळ्यामागे ११ हजार रुपयांनी महागले

सोन्याची दरवाढ सुरूच; आज पुन्हा तोळ्यामागे ११ हजार रुपयांनी महागले

Jalgaon Gold Rate: सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज सोने पुन्हा एकदा महागले आहे. सोने तोळ्यामागे ११ हजार रुपयांनी वधारले आहे. सोन्याचे दर प्रति तोळा एक लाख ७६ हजार रुपये इतके झाले आहेत तर चांदी प्रति किलो ३ लाख ८० हजार रुपयांवर पोहोचली आहे. डॉलर वधारलाय तसेच इराण व अमेरिकेत सुरू असलेल्या तणावामुळे सोन्याचे दर वाढले आहेत. औद्योगिक वापरासाठी चांदी मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. त्यामुळे चांदीला चकाकी आली आहे. जोपर्यंत औद्योगिक वापरात चांदीला पर्याय मिळत नाही, तोपर्यंत चांदीचे दर वाढतील असे सराफ व्यावसायिक आकाश भंगाळे यांनी सांगितले. 

Web Title : सोने की कीमतों में फिर उछाल, आज ₹11,000 प्रति तोला महंगा।

Web Summary : सोने की कीमतें लगातार बढ़ रही हैं, ₹11,000 प्रति तोला तक बढ़ गई हैं। सोना ₹1,76,000 प्रति तोला और चांदी ₹3,80,000 प्रति किलो पर पहुंच गई है। डॉलर की मजबूती और अमेरिका-ईरान तनाव से वृद्धि हुई है। औद्योगिक उपयोग से चांदी की मांग बढ़ी है; कीमतें बढ़ती रहेंगी।

Web Title : Gold prices surge again, up ₹11,000 per tola today.

Web Summary : Gold prices continue to climb, soaring by ₹11,000 per tola. Gold reaches ₹1,76,000 per tola, while silver hits ₹3,80,000 per kg. Dollar strength and US-Iran tensions fuel the surge. Increased industrial use drives silver's demand; prices will continue to rise.