पोषण आहार घोटाळ्याचा अहवाल उद्या सादर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:54 AM2019-07-19T11:54:37+5:302019-07-19T11:55:20+5:30

जळगाव : जिल्हाभरात गाजत असलेल्या शालेय पोषण आहार घोटाळा चौकशीसाठी नव्याने नियुक्त समितीचा चौकशी अहवाल येत्या शनिवारी २० जुलै ...

Report on Nutrition Disease Report tomorrow | पोषण आहार घोटाळ्याचा अहवाल उद्या सादर होणार

पोषण आहार घोटाळ्याचा अहवाल उद्या सादर होणार

Next

जळगाव : जिल्हाभरात गाजत असलेल्या शालेय पोषण आहार घोटाळा चौकशीसाठी नव्याने नियुक्त समितीचा चौकशी अहवाल येत्या शनिवारी २० जुलै रोजी सादर करू, अशी माहिती समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी दिली आहे़
या अहवालात मात्र काय आहे याबाबत त्यांनी गुप्तता पाळली आहे़ मस्कर हे जुलै अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणार आहे़ त्यामुळे या चौकशीचे नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते़ मात्र, आपण निवृत्त होण्याआधी हा अहवाल सोपवूनच निवृत्त होऊ, असे मस्कर यांनी म्हटले आहे़
जिल्हाभरातील चार तालुक्यातील २३ शाळांमध्ये धान्य न देताच त्यांची देयके अदा करण्यात आली होती़ यात गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शालेय पोषण आहार अधीक्षक आदींनी बनावट शिक्के व स्वाक्षऱ्यांच्या आधारावर हा प्रकार केल्याचे समोर आले होते़
यासंदर्भात चौकशीची फाईल ही गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेत फिरत आहे़ यासाठी नियुक्त समितीने तिचा अहवाल दिला होता, त्यात संबधितांवर ठपका ठेवण्यात आला होता़
त्यानंतर शिक्षण विभागाने दिलेल्या अभिप्रायातही माल न घेता देयके अदा करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचे म्हटले होते़ यानंतर पुन्हा नवी समिती नियुक्त करण्यात आली होती़ या समितीनेही बराच विलंब करत या प्रकरणाची संथ गतिने चौकशी केली़
गेल्या काही दिवसापासून पोषण आहार घोटाळ्याचा भिजत पडला आहे. या अहवालावर आता सीईओ काय कारवाई करतात, याकडे आता लक्ष लागून आहे.

Web Title: Report on Nutrition Disease Report tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.