डॉ.नीलाभ रोहन यांची बदली ; कुमार चिंथा नवे एएसपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 19:58 IST2020-10-07T19:58:10+5:302020-10-07T19:58:40+5:30
जळगाव : सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा जळगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.नीलाभ रोहन यांची बुधवारी बदली झाली असून त्यांच्या जागी ...

डॉ.नीलाभ रोहन यांची बदली ; कुमार चिंथा नवे एएसपी
जळगाव : सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा जळगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.नीलाभ रोहन यांची बुधवारी बदली झाली असून त्यांच्या जागी कुमार चिंथा या आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. रोहन यांना नवीन नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही. चिंथा यांची गेल्या आठवड्यात अंमळनेर उपविभाग पोलीस अधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. याच पदावर आणखी एका अधिकार्याची नियुक्ती झाली होती. त्यानंतर चिंथा यांची भुसावळला बदली होती. मंगळवारी त्यांनी पदभार स्वीकारला होता व नंतर पोलीस ठाण्यांना भेटी पण दिल्या होत्या. बुधवारी परत त्यांचे जळगावचे आदेश झाले. आठवडाभरात चिंथा यांचे अंमळनेर, भुसावळ व जळगाव असे तीन ठिकाणचे आदेश निघाले.