पुन्हा सोनसाखळी लांबविली

By Admin | Updated: July 24, 2015 20:08 IST2015-07-24T20:08:16+5:302015-07-24T20:08:18+5:30

शाहू नगरातून ४८ हजार रुपयांची रोकड लांबविण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी संध्याकाळी मोहाडी रस्त्यावर फिरायला गेलेल्या जयश्री पाटील यांच्या गळ्यातून २८ ग्रॅम वजनाची सोनसाखळी लांबविण्याची घटना घडली.

Repeat the chain chain | पुन्हा सोनसाखळी लांबविली

पुन्हा सोनसाखळी लांबविली

 जळगाव : शाहू नगरातून ४८ हजार रुपयांची रोकड लांबविण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी संध्याकाळी ६.३0 वाजता मोहाडी रस्त्यावर फिरायला गेलेल्या जयश्री पाटील (वय ६१) यांच्या गळ्यातून ७0 हजार रुपये किमतीची २८ ग्रॅम वजनाची सोनसाखळी लांबविण्याची घटना घडली. यातील १८ ग्रॅमचे मणी सांभाळण्यास त्यांना यश आले तर दहा ग्रॅमची साखळी मात्र लंपास झाली.
या घटनेतही काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ही सोनसाखळी लांबविली. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला मात्र हाती काहीच लागले नाही. रात्री पाटील या रामानंद नगर पोलीस ठाण्यात गेल्या मात्र फिर्याद देण्याबाबत त्यांचा निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Web Title: Repeat the chain chain