शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अभिलेखे जप्ती स्थगित

By admin | Updated: November 6, 2014 14:59 IST

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात प्रशासन व व्यवस्थापन सांभाळणार्‍या राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीबीबी) अडचणीत येऊ नये यासाठी अभिलेखे जप्त करण्याचे आदेश माघारी बोलाविले गेल्याची माहिती मिळाली आहे.

चंद्रकांत जाधव■ जळगाव

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात प्रशासन व व्यवस्थापन सांभाळणार्‍या राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीबीबी) अडचणीत येऊ नये यासाठी अभिलेखे जप्त करण्याचे आदेश माघारी बोलाविले गेल्याची माहिती मिळाली आहे.
सात मुद्दय़ांसंबंधीच्या कार्यवाहीचा भाग म्हणून दूध संघातून अभिलेखे जप्त करण्याचे आदेश १ जुलै रोजी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) एम.जी.वाके यांनी तहसीलदार, जळगाव यांना दिले होते. हे आदेश निघताच सेटलमेंटचा कार्यक्रम एनडीडीबीने आखला. आदेश १ जुलैला निघाले आणि लागलीच १0 जुलैला दुग्ध विकास राज्यमंत्री संजय सावकारे यांनी दुग्ध विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक बोलावली. त्यात एनडीबीबीची बाजू वजनदार ठरली आणि नियमांचा भंग करून अभिलेखे जप्त करण्याच्या आदेशांवर पाणी फिरविणारे आदेश विभागीय उपनिबंधक (दुग्ध) वाके यांनी ११ जुलै रोजी काढले. त्यात दूध उत्पादक संघ र्मया. जळगाव यांनी आवश्यक असलेली कागदपत्रे विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांना पुरविली जातील, असे म्हटले आहे. यामुळे अभिलेखे जप्त करण्याची कार्यवाही स्थगित केली जावी, अशी विनंती करण्यात येत आहे, असे म्हटले आहे. 
अभिलेखे जप्त करण्याच्या कार्यवाहीला स्थगीती दिल्याची माहिती या प्रकरणातील तक्रारदार डी.के.पाटील यांना दिली गेली नाही. याचा अर्थ एकांगी कारवाईचा प्रकार या प्रकरणात झाला. 
नियमानुसार आदेशांना स्थगीती देण्याचा अधिकार सहनिबंधक (दुग्ध), मुंबई यांचा होता, पण अभिलेखे जप्त करण्याच्या आदेशांना स्थगीती ही विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांनीच एका आदेशाद्वारे दिली. याचा अर्थ नियमांचे उल्लंघन केले गेले. यामुळे विभागीय उपनिबंधक (दुग्ध) वाके यांच्या या प्रकरणातील भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, त्या कारवाईच्या कचाट्यात अडकू शकतात. 
 
संघावर कारवाई काय?
अभिलेखे जप्त करण्याचे आदेश देताना दूध संघ आवश्यक कागदपत्र पुरवेल, असे कारण दिले गेले, पण अजूनही दूध संघाने विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांच्या कार्यालयास ही कागदपत्रे सादर केलेली नाही. असे असताना दूध संघातील एनडीडीबीच्या प्रशासनाला जाब विचारण्यात आलेला नाही. 
 
भागभांडवल प्रकरणी एनडीडीबी शांत का?
पाच कोटी रुपये एवढे भागभांडवल एनडीडीबीने दूध संघाचे सभासद असलेल्या डेअरी सोसायट्यांकडून घेतले आहे. हे भागभांडवल संबंधित सोसायट्या अडचणीत आलेल्या असताना दिले गेले नाही. यामुळे सोसायट्या अनिष्ट तफावतीत आल्या. हळूहळू अनेक सोसायट्या बंद पडल्या. बंद पडणार्‍या सोसायट्यांची संख्या ८0 टक्के एवढी झाली. बंद पडलेल्या सोसाट्यांसाठी काय केले, त्यांच्या भागभांडवलचे काय झाले? या प्रश्नांची उत्तरे दूध संघाचे प्रशासन सांभाळणारी एनडीडीबी देत नाही.  या प्रकरणात या महिन्याच्या अखेरिस सहनिबंधक (दुग्ध) मुंबई यांच्याकडे अंतिम सुनावणी होत आहे. तक्रारदार डी.के.पाटील त्यात उपस्थित राहतील. 
 
■ दूध संघ प्रशासनाने जी माहिती दुग्ध विभागाने मागविली ती देणे अनेकदा टाळले. नंतर नोटिसा आल्यानंतर प्रकरणे मॅनेज करण्यात आली. दूध संघातील अनागोंदी लपविण्यासाठी राज्य शासनाच्या दुग्ध विभागातील अधिकार्‍यांनी मोठी मदत केली आहे. विधायक पद्धतीने, सर्व पुराव्यांसह पाठपुरावा करूनदेखील निर्णय फिरविले जातात. या प्रकाराविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल. -डी.के.पाटील, तक्रारदार