शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर खडड्याचा पुन्हा एक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 22:41 IST

अपघाताची मालिका सुरूच । मालवाहू वाहन उलटून एक ठार ,तीन जखमी

पारोळा : पारोळा तालुक्यातील दळवेल जवळ महामार्गावर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्न करत असताना मालवाहू चारचाकी वाहन उलटून झालेल्या अपघातात त्यावरील क्लिनर इस्लामोद्दीन गुलाब वारीस (वय ४०) रा. खुदागंज जिल्हा सितापूर (उ.प्र.) हा जागीच ठार होऊन अन्य तिघे जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.राष्टÑीय महामार्ग क्रमांक सहावर मोठमोठे खड्डे पडलेले असताना त्याकडे राष्टÑीय रस्ते विकास प्राधिकरणाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे निरपराध व्यक्तींचा बळी जात आहे. शनिवारी यामुळेच पुन्हा अपघाताची घटना घडली.सकाळी घडली दुर्घटना१४ रोजी सकाळी ६.३० वाजता महामार्ग क्रमांक ६ वरून धुळ्याकडून जळगावकडे मालवाहून वाहन क्रमांक एम.एच. १८- बीजी ४५२४ हे येत असताना दळवेल जवळ गुडलक पेट्रोल पंपाच्या जवळ असलेला मोठा खड्डा चुकवत असताना गाडी उलटली. त्यात इस्लामोद्दीन गुलाब वारीस या गाडीवरील क्किनरच्या डोक्याला मार लागल्याने व गाडीखाली तो दाबला गेल्याने जागीच ठार झाला. अपघातात चालक महेंद्र पाटील रा. पिंप्राळा जि. जळगाव तसेच गणेश सुभाष गुंजाळ रा. पथराड ता. धरणगाव, सुशील कुमार हे तिघे जखमी झाले. जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.