बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगून आलेल्या आरोपीचा पुन्हा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 05:29 PM2021-01-04T17:29:10+5:302021-01-04T17:33:23+5:30

बलात्काराच्या आरोपाखाली सात वर्षाची शिक्षा भोगून दोन महिन्यांपूर्वी गावात आलेल्या आरोपीने पुन्हा पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार केला.

Re-rape of a convicted felon | बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगून आलेल्या आरोपीचा पुन्हा बलात्कार

बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगून आलेल्या आरोपीचा पुन्हा बलात्कार

Next
ठळक मुद्देपोलिसांनी केली अटक.मेहुणबारे येथील घटनेने खळबळ. दोन महिन्यांपूर्वीच आरोपी तुरुंगातून आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : खाऊचे आमिष दाखवून ५ वर्षीय चिमुरडीवर ३७ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना शिरसगाव (ता. चाळीसगाव) येथे रविवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली असून मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीस मनमाड रेल्वेस्टेशवर मेहुणबारे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

तालुक्यातील शिरसगाव येथील ५ वर्षीय चिमुरडीवर आरोपी संदीप सुदाम तिरामली याने मुलीला खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावले रात्री ८ वाजेच्या सुमारास बलात्कार केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

आरोपी पळून जाण्याच्या बेतात

या घटनेची माहिती मुलीने घरात दिल्यावर लागलीच संशयित आरोपी तिरमली याने गावातून पळ काढला. मेहुणबारे पोलीस ठाण्यात नराधमावर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले, उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गोपाळ पाटील, हवालदार योगेश मांडोळे, पो. कॉ. शैलेश माळी, गोरख चकोर यांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस मनमाड रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले.

या ठिकाणी पोलिसांना तेथील स्थानिक पोलीस मित्र व रेल्व पोलिसांनी या नराधामास पकडण्यासाठी मदत केली. अवघ्या दोन तासात पोलिसांनी आरोपी गजाआड केल्याने मेहुणबारे परिसरात कौतुक केले जात आहे. 

शिक्षा भोगून आला होता

आरोपीने अशाच प्रकारे ५ वर्षीय बालिकेवर यापूर्वी बलात्कार केला होता. त्याला ७ वर्ष शिक्षा झाली होती. २ महिन्यांपूर्वी तो शिक्षा भोगून आला होता व पुन्हा त्याने बालिकेवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत शिंदे कमलेश राजपूत करीत आहेत.

Web Title: Re-rape of a convicted felon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.