शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

रावेरला अखेर कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 23:01 IST

‘कापूस खरेदी केंद्राकडे ग्रेडरची पाठ’ असे ठळक वृत्त ‘लोकमत’ला झळकताच कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. मात्र, कापसाची प्रत्यक्षात कापूस खरेदी शनिवारपासून सुरू होणार आहे.

ठळक मुद्दे शनिवारपासून प्रत्यक्षात होणार कापूस खरेदी‘कापूस खरेदी केंद्राकडे ग्रेडरची पाठ’ वृत्त झळकताच केंद्र सुरू

रावेर, जि.जळगाव : ‘कापूस खरेदी केंद्राकडे ग्रेडरची पाठ’ असे ठळक वृत्त ‘लोकमत’ला झळकताच कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. मात्र, कापसाची प्रत्यक्षात कापूस खरेदी शनिवारपासून सुरू होणार आहे.प्रारंभी, गणेश ट्रेडिंग कंपनी या भोकरी नजीकच्या जिनींग कारखान्यात आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते काटापूजन करून खिरोदा प्र.रावेर येथील शेतकरी रवींद्र महाजन यांचा कापूस खरेदी करण्यात आला. यावेळी माजी आमदार अरूण पाटील, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि.प.चे माजी सभापती सुरेश धनके, सभापती श्रीकांत महाजन, मसाकाचे व्हा.चेअरमन भागवत पाटील, ग्रेडर गणेश कराडे, जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, माजी सभापती डी.सी.पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, गोंडू महाजन, खरेदी विक्री संघाचे चेअरमन पी.आर.पाटील, माजी चेअरमन सूर्यभान चौधरी, महेश चौधरी, आदी उपस्थित होते.दरम्यान, कृउबा सभापती श्रीकांत महाजन यांनी कायमस्वरूपी ग्रेडर देण्याबाबत व कापसाच्या आर्द्रतासंबंधी अटीशर्ती शिथिल करण्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.माजी आमदार अरूण पाटील यांनी शासनाने कापूस खरेदी केंद्रास आधीच विलंब केला असल्याने व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता विनाशर्थ व विनाअट शेतकऱ्यांचा कापूस उत्पादन सन्मानाने खरेदी करावा, असे स्पष्ट केले. जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनीही उशिराने होणाºया कापूस खरेदीत शेतकºयांची कोणत्याही कारणास्तव कोंडी होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करून कापूस खरेदी केंद्राच्या खरेदीमुळे स्थानिक बाजारपेठेत बाजारमूल्य वधारण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.आमदार शिरीष चौधरी यांनी शेतकºयांच्या नगदी पीक असलेल्या कापसाला न्याय देण्यासाठी ग्रेडरची कायम नियुक्ती व कापसाच्या आर्द्रतासंबंधी शासन दरबारी तातडीने पाठपुरावा करणार असल्याचे आश्वस्त केले.दरम्यान, या उद्घाटनाच्या मुहूर्ताप्रसंगी मोजलेल्या १०० क्विंटलऩंतर कापूस खरेदी थोपवण्यात आली असून, येत्या शनिवारपासून कापूस खरेदी केला जाणार आहे. बोदवड व रावेर कापूस खरेदी केंद्रातील कापूस खरेदीसाठी आठवड्यातील काही दिवस दोन्हीकडे विभागून कामकाज चालवणार असल्याचे ग्रेडर गणेश कराडे यांनी स्पष्ट केले.सूूत्रसंचालन गोपाळ महाजन यांनी, तर आभार गोंडू महाजन यांनी मानले.

टॅग्स :cottonकापूसRaverरावेर