रत्नापिंप्री, ता.अमळनेर,दि.२- येथील अठरा वर्षीय तरूणीने विषारी द्र्रव्यसेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}} रत्नापिंप्री येथील भाग्यश्री आधार पाटील हिने ३० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास काहीतरी विषारी द्रव्य सेवन केल्याचे लक्षात येताच तिला उपचारासाठी अमळनेर येथे खाजगी रूग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा तिची प्राणज्योत विझली. याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास अमळनेर पोलीस करीत आहेत. तिच्या पश्चात आई ,वडील, आजी, भाऊ, बहिण असा परीवार आहे.तरूणीच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
(वार्ताहर)