शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 21:39 IST

नगरच्या संशयितास अटक : विवाह नोंदणी वेबसाईटवर झाली ओळख

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून वेळावेळी २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात सचिन रावसाहेब इंगळे (२७, रा.शेवगाव जि.अहमदनगर) याला एमआयडीसी पोलिसांनी शेवगाव येथून अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी मुळ चोपडा तालुक्यातील रहिवाशी असून २०१४ मध्ये जळगाव शहरात एका महाविद्यालयात एमसीएमचे शिक्षण घेण्यासाठी शहरात वास्तव्याला होती. त्याकाळात तिने विवाहसाठी विवाह नोंदणी वेबसाईटवर आॅनलाईन नोंदणी केली. तेव्हा सचिन इंगळे हा तरुण संपर्कात आला. दोघांमध्ये ओळख वाढल्याने फोनवर बोलणे होऊ लागले. त्यानंतर २०१५ मध्ये तो जळगाव शहरात तरुणीला भेटण्यासाठी आला होता.कालिंका माता चौक परिसरातील साई लॉजवर नेऊन त्याने लग्नाचे कारण सांगून शारीरीक संबंध प्रस्थापित केले. दुसऱ्या दिवशी पीडितेला घेऊन तो गावाला घेऊन गेला व तेथे त्याच्या आई, वडीलांची भेट घालून दिली. त्यांनी लग्नाबाबत विचारणा केली असता दोघांनी त्यास होकार दिला.२०१९ या वर्षात सचिन याने अयोध्या नगरात भाड्याने खोली घेतली. दोन महिन्याच्या काळातही त्याने वेळोवेळी शारीरीक संबंध प्रस्थापित केले.त्यातून पीडित गर्भवती राहिली. पुन्हा एकदा सोनोग्राफी केली असता त्यातही निष्पन्न झाले. पीडितेने गर्भपातास नकार दिला असता सचिन याने प्रतिभा हॉस्पिटल येथे दाखल करुन तेथे खोटे मंगळसूत्र घातले. तेथे गर्भपाताच्या गोळ्या खायला दिल्या. त्यामुळे पीडिता बेशुध्द झाली. या प्रकारानंतर त्याने थेट लग्नालाच नकार दिला व शेवगाव येथे निघून गेला. त्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता.संशयिताच्या अटकेसाठी पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी सहायक फौजदार रामकृष्ण पाटील, हेमंत कळसकर व पंकज सापकर यांचे पथक नेमले होते. या पथकाने बुधवारी त्याच्या मुसक्या आवळल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव