शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

११४ विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या मुला-मुलींना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो. नुकतेच शाळा व कनिष्‍ठ महाविद्यालयात प्रथम येणाऱ्या अनुसूचित जातीतील ११४ विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्‍यात आले आहे.

अनुसूचित जाती, विजाभज आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाने २००३ मध्ये गुणवत्ता पुरस्कार सुरू केले आहेत. यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार दिले जातात. सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून अनुसूचित जाती, विजाभज आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना दहावी किंवा बारावीत राज्यात प्रथम आल्यास अडीच लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र राज्य शासनाकडून देण्‍यात येते. प्रत्येक बोर्डातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला एक लाख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र तसेच विभागीय बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्‍ये आलेल्या अनुसूचित जाती, विजाभज आणि विशेष मागास प्रवर्गाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ५० हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, त्याचबरोबर जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व तालुक्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला दहा हजार रुपये स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्‍यात येते. तसेच शाळेत व कनिष्‍ठ महाविद्यालयात प्रथम येणाऱ्यांना पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र दिले जाते.

बोर्डाकडून यादी प्राप्त

काही दिवसांपूर्वी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाला जळगाव जिल्ह्यातील दहावी व बारावीत शाळा व महाविद्यालयात प्रथम येणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांची यादी बोर्डाकडून प्राप्त झाली होती. त्यानुसार ११४ प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयातर्फे राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्‍यात आले आहे.

अशी आहेत पुरस्कार प्राप्त

एकूण ११४ पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता दहावीतील ८५ तर इयत्ता बारावीतील २९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नुकतीच पुरस्काराची रक्कम शाळा, महाविद्यालयांना पाठविण्यात आली आहे. शाळांकडून धनादेशाच्या स्वरूपात ही रक्कम विद्यार्थ्यांना प्रदान करण्‍यात येत आहे.

०००००००००००००

पुरस्काराची रक्कम

राज्यातून प्रथम : २,५००००

बोर्डातून प्रथम : १,०००००

विभागीय बोर्डातून प्रथम : ५०,०००

जिल्ह्यातून प्रथम : २५,०००

तालुक्यातून प्रथम : १०,०००

शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम : ५,०००

०००००००००००००००

पुरस्कार प्राप्त विद्यार्थी संख्या

एकूण : ११४

इयत्ता १० वी : ८५

इयत्ता १२ वी : २९