शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणांवर प्रश्नचिन्ह, जळगाव जिल्ह्यात ७० विद्यार्थ्यांना थॅलेसिमिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:10 IST

साडेचौदा हजार विद्यार्थ्यांची तपासणी बाकी, ‘सिकलसेल’चा आकडा वाढण्याची शक्यता

जळगाव : जिल्ह्यात आरोग्य विभागाने त्रयस्थ संस्थेकडून राबविलेल्या तपासणी मोहीमेंतर्गत अद्याप साडेचौदा हजार विद्यार्थ्यांची तपासणी बाकी असून सिकलसेल झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ यात भरात भर म्हणजे ७० विद्यार्थ्यांना थॅलेसिमिया असल्याचेही समोर आले आहे़लालमाती आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचा आरोग्याचा गंभीर प्रश्न समोर आला आहे त्यानंतर प्रथमच आरोग्य विभागाने त्रयस्थ संस्थेकडून तपासणी मोहीम राबविली असता यातून धक्कादायक निष्कर्ष समोर आलेले आहे़त. जिल्ह्यात अद्याप साडेचौदा हजार विद्यार्थ्यांची तपासणी बाकी असून सिकलसेल झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ त्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे वैद्यकीय सल्ला मागितला आहे़ ७० विद्यार्थ्यांना थॅलेसिमिया असल्याचेही समोर येत आहे़जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा रूग्णालयातर्फे संयुक्तपणे सिकलसेची तपासणी केली होती़ या तपासणीनुसार गेल्या वर्षभरात केवळ दहा नवे रूग्ण समोर आले होते़ अकरा वर्षातील हा आकडा अडीचशेपर्यंत मर्यादीत होता़ मात्र, त्रयस्थ संस्थेकडून केवळ आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर साडे नऊ हजार विद्यार्थ्यांच्या तपासणीत २ हजार विद्यार्थ्यांना सिकलसेल असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे़ हा अनुवंशिक आजार असल्याने आरोग्य विभागाला या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीची आजपर्यंत गरज भासली नाही का? किंवा गेल्या ८ वर्षापासून होणारे सर्व्हेक्षण हे केवळ वरच्यावर होते का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत़ गेल्या वर्षी हिवताप विभागाच्या सर्व्हेक्षणातून जिल्ह्यात केवळ एकच हिवतापाचा रूग्ण असल्याचा निष्कर्ष समोर आला होता़ डेंग्यू, हत्तीरोग इत्यादींबाबतच्या सर्व्हेक्षणातून समोर येणारी आकडेवारीही व खासगी रूग्णालयातून समोर येणारे रिपोर्ट यामध्येही तफावत असल्याने या सर्व सर्व्हेक्षणांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे़७० विद्यार्थ्यांना थॅलेसिमियात्रयस्थ संस्थेने चौदा दिवसात केलेल्या सर्व्हेक्षणातून अनेक गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत़ यात ७० विद्यार्थी थॅलेसिमिया आजाराने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे़ आदिवासी विकास विभागामार्फे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात असताना जिल्ह्यातील ही आकडेवारी धक्कादायक असल्याचे मानले जात आहे़उर्वरित विद्यार्थ्यांची तपासणी होणार का?...आरोग्य विभागाने त्रयस्थ संस्था एचएलएल कडून हे सर्व्हेक्षण करून घेतले आहे़ यात अनेक विद्यार्थ्यांचे रक्तनमुने घ्यायचे बाकी असून पुन्हा एकदा रक्त तपासणी होणार आहे़ अशा स्थितीत ९ हजार विद्यार्थ्यांच्या सर्व्हेक्षणाचा खर्चच एक ते दीड कोटीच्या घरात गेल्यामुळे आता आरोग्य विभाग उर्वरित विद्यार्थ्यांची तपासणी करणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़आदिवासी विकास विभागाची रूग्णवाहिका असून त्याद्वारे नियमित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होते. मात्र यंदा प्रथमच सिकलसेलबाबत तपासणी करून घेण्यात आलेली आहे़ आम्ही आजच जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र देऊन नेमकी आकडेवारी व उपायोजनांबाबत वैद्यकीय सल्ला मागितला आहे़-विनिता सोनवणे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी

टॅग्स :Jalgaonजळगाव