शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

153 विंधन विहिरींचे प्रस्ताव

By admin | Updated: September 15, 2015 19:10 IST

जिल्ह्यात सद्य:स्थितीत पावसाने दिलेली उघडीप पाहता टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊ पाहत आह़े

धुळे : जिल्ह्यात सद्य:स्थितीत पावसाने दिलेली उघडीप पाहता टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊ पाहत आह़े संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ सप्टेंबर 2015 ते मे 2016 र्पयतचा उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या आराखडय़ावर सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिका:यांच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला़ जिल्ह्यातून सर्वाधिक 153 विंधन विहिरींचा प्रस्ताव दाखल झाला आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सोमवारी टंचाईबाबत बैठक घेण्यात आली़ या वेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होत़े टंचाईबाबत उपाययोजनांनुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त झालेली माहिती बैठकीत सादर करण्यात आली़ विशेष म्हणजे सप्टेंबर 15 ते मे 16 या कालावधीत प्रत्येक महिन्यात कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याचा प्राथमिक आराखडा सादर करण्यात आला़

विंधन विहिरी तर काही ठिकाणी कूपनलिका घेण्यात येणार आहेत. त्यानुसार सप्टेंबर 2015 मध्ये 1, ऑक्टोबर महिन्यात 37, नोव्हेंबर महिन्यात 5, डिसेंबर महिन्यात 7, जानेवारी 2016 मध्ये 17, फेब्रुवारीत 19, मार्चमध्ये 45, एप्रिलला 17 आणि मे महिन्यात 5 ठिकाणी विंधनविहिरी; अशा एकूण 153 ठिकाणी ही उपाययोजना घेण्याचे प्राथमिक स्तरावर निश्चित करण्यात आले आह़े नळ योजना विशेष दुरुस्तीचे काम सप्टेंबर महिन्यात एकही घेण्यात आलेले नाही़ ऑक्टोबर 15 मध्ये 9, नोव्हेंबर महिन्यात 4, जानेवारी 2016 मध्ये 2, मार्च महिन्यात 3 आणि एप्रिल 16 मध्ये 5 अशा एकूण 23 ठिकाणी नळ योजनांची विशेष दुरुस्ती होणार आह़े

तात्पुरती पूरक योजना लक्षात

घेतल्यास ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी 8, डिसेंबर महिन्यात 16, जानेवारी 2016 मध्ये 7, फेब्रुवारी महिन्यात 4, मार्च महिन्यात 14 आणि एप्रिल 16 मध्ये 2 असे एकूण 59 प्रस्ताव तात्पुरत्या पूरक योजनेचे आहेत़ खासगी विहिरी अधिग्रहीत करणे या योजनेत सप्टेंबर महिन्यात 13, ऑक्टोबर महिन्यात 16, नोव्हेंबर महिन्यात 12, डिसेंबर महिन्यात 20, जानेवारी 2016 मध्ये 34, फेब्रुवारी महिन्यात 17, मार्च महिन्यात 47, एप्रिल महिन्यात 31 आणि मे 16 या महिन्यात 2 असे एकूण 192 ठिकाणी खासगी विहिरींचे अधिग्रहण होणार आह़े विहीर खोल करणे आणि त्यातील गाळ काढणे याचेदेखील मोठय़ा प्रमाणावर प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्यानुसार सप्टेंबर महिन्यात 1, ऑक्टोबर महिन्यात 47, नोव्हेंबरमध्ये 15, डिसेंबर महिन्यात 17, जानेवारी 2016 मध्ये 40, फेब्रुवारी महिन्यात 11, मार्च महिन्यात 62, एप्रिलमध्ये 44 आणि मे महिन्यात 5 अशा एकूण 242 ठिकाणी विहिरी खोल करण्यात येणार आहेत़ काही विहिरींचा गाळदेखील काढण्यात येणार आह़े बुडक्या घेण्याच्या कामांचे नियोजनदेखील झाले आह़े त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात 1, नोव्हेंबरमध्ये 2 आणि डिसेंबर 2015 ते मार्च 2016 या कालावधीत प्रत्येकी 1 याप्रमाणे 7 ठिकाणी ही उपाययोजना होणार आह़े

टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन देखील आखण्यात आले आह़े त्यानुसार, सप्टेंबर महिन्यात 18, ऑक्टोबर महिन्यात 5, नोव्हेंबर महिन्यात 2, डिसेंबरमध्ये 3, जानेवारी 2016 मध्ये 30, फेब्रुवारी महिन्यात 4, मार्च महिन्यात 7 आणि एप्रिल महिन्यात 29 अशा एकूण 98 ठिकाणी उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले आह़े प्रगतीत असलेल्या पाणीपुरवठा योजनांचे काम 8 ठिकाणी निश्चित करण्यात आले आह़े त्यानुसार मार्च 2016 या महिन्यात 2 आणि एप्रिल 16 या महिन्यात 6 ठिकाणचा समावेश करण्यात आला आह़े