एरंडोल येथे वकृत्व व गायन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:20 IST2021-08-27T04:20:41+5:302021-08-27T04:20:41+5:30

एरंडोल : येथील गुरू हनुमान कुस्तीगीर संस्था व न्यू ड्रीम क्लासेस यांच्यातर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धा व गायन स्पर्धा ...

Prize distribution to the winners of the oratory and singing competition at Erandol | एरंडोल येथे वकृत्व व गायन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

एरंडोल येथे वकृत्व व गायन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

एरंडोल : येथील गुरू हनुमान कुस्तीगीर संस्था व न्यू ड्रीम क्लासेस यांच्यातर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धा व गायन स्पर्धा यातील विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमेश परदेशी होते. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक प्रा. मनोज पाटील, ॲड. नितीन महाजन, योगेश महाजन, नितीन चौधरी, दशरथ चौधरी, बळीराम महाजन, बी. के. धूत, डी. एस. पाटील, प्रा. सुधीर शिरसाट प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

प्रास्ताविक गुरू हनुमान कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष भानुदास सारखे यांनी केले. सूत्रसंचालन पंकज पाटील यांनी, तर अनिल मराठे यांनी आभार मानले.

यावेळी दिलीप सोनवणे, अनिल आरखे, अनिल भोई, ऋषिकेश महाजन, विजय महाजन, दुर्गादास वानखेडे, नयना आरखे, सविता आरखे, मराठे निपूर वानखेडे आदी उपस्थित होते.

Web Title: Prize distribution to the winners of the oratory and singing competition at Erandol