शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 22:22 IST

भुसावळचे प्रकरण । तपास यंत्रणेविरुद्ध दिला होता निर्णय

भुसावळ : जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात तपास यंत्रणेवर संशय व्यक्त करत आरोपीला अटक करावी या फिर्यादीच्या याचिकेवकर उच्च न्यायालयाने तसे आदेश दिले होते. मात्र आरोपीच्या अटकेसंदर्भातील अधिकार हा तपासयंत्रणेचा असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देत या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशांना स्थगिती दिली आहे.येथील माजी नगरसेवक आणि व्यावसायिक मनोज बियाणी यांनी २०१८ मध्ये भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनला माजी आयपीएस सुनील पारसकर यांचे बंधू विवेक पारासकर यांच्याविरुद्ध २०१५ ला तक्रार दिली. यात खोटा ७/१२ उतारा दाखवून खडके शिवारात अस्तित्वात नसलेली जमीन विकण्याचा सौदा करून ईसार पावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे ९० लाख रुपये रोख घेतले. परंतु दिलेल्या मुदतीत खरेदी करून दिली नाही, या फिर्यादीवरुन उमेश राठी आणि विवेक पारस्कर यांच्याविरुद्ध बियाणी यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल दाखल झाला होता. याप्रकरणी हेतूपुरस्कर मुख्य आरोपी विवेक पारसकर यांना अटक करत नसल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या देखरेखीत तपास व्हावा व पारसकर यांना अटक करावी, अशी याचिका औरंगाबाद उच्च न्यायालायात बियाणी यांनी दाखल केली.सुनावणीदरम्यान न्यायालयाने पारसकर यांना तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त करत पोलीस उप.अधीक्षक राठोड यांचा लेखी खुलासा मागवला. तसेच ते हजर न झाल्यास त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याचे आदेश दिले होते. यानंतर उपाधीक्षक राठोड यांनी विवेक पारसकर यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरु केले.मात्र सदर आदेशाविरुद्ध पारसकर यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पिटीशन दाखल केले. पारस्कर यांची बाजू अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी मांडली. त्यांनी सर्वोच्च न्यायालया पुढे युक्तिवाद केला की, एखाद्या आरोपीला अटक करायचे की नाही याचे संपूर्ण अधिकार हे तपास यंत्रणेला असतात. संबंधित आरोपी कागदोपत्री पुरावे हे तपास अधिकारी यांना उपलब्ध करून देत असेल आणि अशा स्थितीत जर तपास यंत्रणेला त्या आरोपीला अटक करण्याची गरज वाटत नसेल तर त्यात काहीही वावगे नाही. त्यांनी यासंदर्भातले न्यायनिवाडे सादर असता सर्वोच्च न्यायालयाने (न्या.डी.वाय.चंद्रचूड व ऋषिकेष रॉय) उच्च न्यायालयाच्या तिन्ही आदेशांना स्थगिती दिली.