शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिसी हडपली!

By admin | Updated: November 18, 2014 14:37 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या वेतनामधून एलआयसीच्या पॉलीसीपोटी कपात केलेली रक्कम कुठे गेली याचा शोध अजूनही लागलेला नाही. जिल्हा परिषद व यावल येथील शिक्षणब विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.

जळगाव : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या वेतनामधून एलआयसीच्या पॉलीसीपोटी कपात केलेली रक्कम कुठे गेली याचा शोध अजूनही लागलेला नाही. जिल्हा परिषद व यावल येथील शिक्षणब विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी अशी एक तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती. ती मार्गी लागलेली नाही. आता पुन्हा यासंदर्भात एक तक्रार धामणगाव येथील शिक्षक नारायण कुंभार, यावल तालुक्यातील पुनगाव येथील किरण सपकाळे या शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. 
कुंभार यांनी म्हटले आहे की, कोळन्हावी शाळेत कार्यरत असताना नोव्हेंबर २0१0 ते ऑक्टोबर २0१२ या दरम्यान २४ हप्त्यांमध्ये १३ हजार ९५0 रुपये एवढे पैसे वेतनातून पॉलीसीपोटी कपात करण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी २0११ पासून तीन हजार १४१ रुपयांचे एकूण ११ हप्ते वेतनातून कपात झाले. या रकमेची चौकशी केली असता ती एलआयसीच्या सावदा शाखेमध्ये जमा झालेलीच नव्हती. असाच प्रकार किरण सपकाळे यांच्याबाबतही झाला आहे. त्यांच्या वेतनातून विविध कालावधित ११ हप्ते कपात करण्यात आले, परंतु रक्कम जमा झालेली नाही. यामुळे शिक्षक संभ्रमात असून, या रकमेचे झाले काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 
शिक्षकांनुसार या प्रकाराची माहिती गटशिक्षणाधिकार्‍यांकडे केली होती, परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्याची वेळीच दखल घेतली असती तर कपात केलेल्या रकमेबाबत योग्य माहिती समोर येऊन ती रक्कम शिक्षकांना मिळाली असती. पं.स.च्या गटविकास अधिकार्‍यांकडेदेखील या प्रकाराची माहिती गेली होती. त्यांनी या रकमेबाबत योग्य ती माहिती घेऊन शिक्षकांच्या खात्यात ही रक्कम येईल, असे आश्‍वासन दिले होते. परंतु कुठल्याही गटविकास अधिकार्‍याने या रकमेबाबत योग्य ती कार्यवाही केलेली नाही. 
या रकमेचे झाले काय, असा प्रश्न अनेक शिक्षकांच्या मनात आहे. कारण अनेक शिक्षकांच्या वेतनातून एलआयसीच्या पॉलीसीपोटी कपात केलेली रक्कम कुठे आहे याची माहिती ना एलआयसी देते ना शिक्षण विभाग. त् रक्कम कुणाच्या घशात गेली असा संतप्त प्रश्न शिक्षक करीत आहेत. शिक्षण विभागाने योग्य ती चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.