मास्क न वारणाऱ्या ३८६ जणांवर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 20:06 IST2021-02-19T20:03:18+5:302021-02-19T20:06:47+5:30
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने प्रत्येक व्यक्तीला मास्क सक्तीचा केला आहे, इतकेच काय तर लग्न समारंभ व अंत्यविधीवरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्याची कडक अमलबजावणी गुरुवारपासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळपासून ते शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जिल्हाभरात सायंकाळी मास्क न वापरणाऱ्या ३९६ जणांवर कारवाईचा दंडूका उगारला. त्यांच्याकडून १ लाख ५३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मास्क न वारणाऱ्या ३८६ जणांवर पोलिसांची कारवाई
ref='https://www.lokmat.com/topics/jalgaon/'>जळगाव : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने प्रत्येक व्यक्तीला मास्क सक्तीचा केला आहे, इतकेच काय तर लग्न समारंभ व अंत्यविधीवरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्याची कडक अमलबजावणी गुरुवारपासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळपासून ते शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जिल्हाभरात सायंकाळी मास्क न वापरणाऱ्या ३९६ जणांवर कारवाईचा दंडूका उगारला. त्यांच्याकडून १ लाख ५३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.पोलीस दलाकडून गुरुवारी सायंकाळ पासून चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनाही या कामात उतरविण्यात आले होते. पोलीस वाहनातून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले जात होते. काव्यरत्नावली चौक, प्रभात चौक, मू.जे.महाविद्यालय, टॉवर चौक या भागात प्रभारी अधिकारी, सुय्यम अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरविण्यात आले होते. जळगाव शहरात सर्वाधिक कारवाया झाल्या आहेत. काही ठिकाणी ५०० तर काही ठिकाणी २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे यापुढेही कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली.