शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

चोपडा येथे जुगार व अवैध दारू अड्ड्यांंवर पोलिसांच्या धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:57 PM

चौघांना अटक, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

चोपडा, जि.जळगाव : येथे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या पथकाने जुगार व अवैध दारू अड्ड्यांंवर धाडी टाकून सहा आरोपींंवर कारवाई केली. यात साडेबारा हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, १७ रोजी दुपारी एकच्या सुमारास शहरात विविध पाच ठिकाणी जुगार व अवैध दारू अड्ड्यांवर धाडी टाकण्यात आल्या. मुंबई दारूबंदी कायदा अन्वये १ आणि मुंबई जुगार कायदा अंतर्गत चार गुन्हे दाखल केले असून, ६९७३ रुपये किमतीचा अवैध मद्यसाठी जप्त करण्यात आला. तसेच चार आरोपींना अटक करण्यात आली. आरोपी हे कल्याण मटका नावाने सट्टा लावताना आढळले. चौघा आरोपींविरुद्ध जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून पाच हजार ७५० रुपये जप्त करण्यात आले.याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्याद दिली. त्यावरून प्रभाकर हरी महाजन रा.चहार्डी, संदीप मधुकर पाटील, अजय मोतीलाल राजपूत, चुनीलाल बुधा पाटील रा.गुजरअळी, सुनील युवराज बाविस्कर रा.आडगाव, लाखीचंद आधार महाजन रा.चुंचाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, पोलीस शिपाई नितीन वाले, पोलीस नाईक सुनील पाटील, प्रशांत वाडीले, रवींद्र ठाकरे, नितीन आगोने यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crimeगुन्हाChopdaचोपडा