जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 21:18 IST2021-03-06T21:18:48+5:302021-03-06T21:18:48+5:30
जळगाव : शहरातील दाणाबाजार परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी दुपारी शहर पोलिसांना छापा मारला. यात पोलिसांनी सतीश मेघराजमल ...

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
जळगाव : शहरातील दाणाबाजार परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी दुपारी शहर पोलिसांना छापा मारला. यात पोलिसांनी सतीश मेघराजमल सिंधवाणी (३०, रा. सिंधी कॉलनी) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला असून त्याच्याजवळून ४३० रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय निकुंभ, राजकुमार चव्हाण, तेजस मराठे, नाशिर शेख आदींनी केली आहे. रतन गिते यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.