शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या सराफा दरोड्यात जळगावच्या बडतर्फ पोलिसाचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:40 IST

तपास पथक शहरात दाखल

जळगाव : पुणे शहरातील कोथरुडमधील पेठे ज्वेलर्स या दुकानात पिस्तुलधारी दोघांनी टाकलेल्या दरोड्यात जळगाव पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या पोलिसाचा सहभाग असल्याचे सीसीटीव्ही फुटेज व प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्याच्या शोधार्थ पुणे पोलिसांचे एक पथक सोमवारी जळगावात दाखल झाले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड येथे २४ नोव्हेंबर २०१९ रोजी भरदिवसा दुपारी साडे चार वाजता पेठे ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात दोघांनी प्रवेश करुन गावठी पिस्तुल मंगेश वेदक यांच्या दिशेन रोखला. त्यानंतर ‘गप बसायचं, आवाज नाय पाहिजे, हात वर करायचे आणि सोन्याचा सगळा माल काढून खाली ठेवायचा आवाज केला तर गोळी घालेन’ अशी धमकी देत दुकानातून १० लाख १९ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले होते. याप्रकरणी मंगेश मनोहर वेदक (रा. काळभोरनगर, पुणे) यांच्या फिर्यादीवरुन कोथरुड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी तपास करीत आहेत.सीसीटीव्हीत दोन्ही संशयित कैदया सोन्याच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली असून दरोडेखोरांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. हे फुटेज राज्यभर व्हायरल झाले आहेत. त्यावरुन त्यातील एक जण जळगावचा बडतर्फ पोलीस असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. दुकानातून निघाल्यानंतर दोघं संशयित गळ्यात बॅग अडकवून रस्त्याने काही अंतर चालत गेले आहेत. जळगाव पोलिसांकडे हे फुटेज प्राप्त झाले आहे. पुणे पोलिसांचे एक पथक सोमवारीच दाखल झाले. त्यांनी सकाळी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांची भेट घेतली. दरम्यान, या बडतर्फ पोलिसासोबत आणखी एक जण असून तो कुठला व कोण आहे हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. तीन वर्षापूर्वी जामनेर पोलीस स्टेशनला दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात या पोलिसाचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर तत्कालिन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी या कर्मचाºयाला सेवेतून बडतर्फ केले होते. आता पुण्याच्या दरोड्यातही त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.जळगावातून चोरलेल्या दुचाकीचा वापरया दरोड्यात दोघांनी ज्या दुचाकीचा वापर केला, ती दुचाकी जळगावातून चोरल्याचे निष्पन्न झाले. या दुचाकीमुळे दरोडेखोर जळगाव जिल्ह्यातील असावेत, असा संशय तेथील पोलिसांना आला. या दुचाकीची माहिती जळगाव पोलिसांकडून काढली जात आहे. दुचाकी नवीन असल्याने आरटीओकडे त्याची नोंदणी झालेली नाही, त्यामुळे सोमवारी काही पोलीस शोरुममध्ये चौकशीसाठी गेले होते. ही दुचाकी कोणाच्या नावावर आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव