पोलीस भरतीची तयारी करणाऱ्याला पोलिसाची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 12:37 IST2020-08-05T12:36:47+5:302020-08-05T12:37:18+5:30
जळगाव : पोलीस भरतीची तयारी करणाºया प्रफुल्ल गायकवाड या तरुणाला दोन पोलिसांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली असून या ...

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्याला पोलिसाची मारहाण
जळगाव : पोलीस भरतीची तयारी करणाºया प्रफुल्ल गायकवाड या तरुणाला दोन पोलिसांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली असून या घटनेत गायकवाड गंभीर जखमी झाला आहे. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाण करणारे पोलीस मद्याच्या नशेत असल्याचा आरोप या तरुणांनी केली आहे. पोलीस कवायत मैदानावर मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता ही घटना घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल गायकवाड व वसीम तडवी हे दोन तरुण पोलीस भरतीची तयारी करीत आहेत. नेहमीप्रमाणे मंगळवारी पोलीस कवायत मैदानावर तयारीसाठी गेले असता तेथे कमांडोच्या गणवेशात असलेल्या दोन पोलिसांनी मैदानावर येण्यास मज्जाव करुन एकाने गायकवाड याला बेदम मारहाण केली. तडवी पोलीस बॉईज असल्याने त्याला मारहाण केली नाही. गायकवाड याच्या बरगड्या फ्रॅक्चर झालेल्या आंहेत. या घटनेनंतर याच ठिकाणी या कर्मचाºयाने आणखी एका तरुणाला मारहाण केली. त्यानंतर पुन्हा शिवाजी पुतळ्याजवळ दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरुन एका दुचाकीस्वाराला मारहाण केली. हा कर्मचारी मद्याच्या नशेत होता, असे या जखमी तरुणाचे म्हणणे आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करण्यात आली.