शिरसमणी येथे पोकलँड मशीन जळून खाक; चालक बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 22:02 IST2021-01-17T22:02:11+5:302021-01-17T22:02:58+5:30
केबल टाकण्यासाठी चारी खोदत असताना पोकलँडने अचानक पेट घेत जळून खाक झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.

शिरसमणी येथे पोकलँड मशीन जळून खाक; चालक बचावला
ठळक मुद्देशिरसमणी-चोरवड रस्त्यावरील घटना.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : तालुक्यातील शिरसमणी येथे शिरसमणी-चोरवड रस्त्यावर केबल टाकण्यासाठी चारी खोदत असताना पोकलँडने अचानक पेट घेत जळून खाक झाल्याची घटना आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत किरण देवरे (मेहु, ता. पारोळा) यांचे २५ लाख रुपये किमतीचे पोकलॅंड हे शिरसमणी चोरवड रस्त्यावर ऑनलाईन केबल टाकण्यासाठी काम सुरू असताना पोकलॅंडने अचानक पेट घेऊन जळून खाक झाले. यावेळी पारोळा नगरपालिकेचे अग्निशमक बंब पाचारण करण्यात आले होते. तोपर्यंत पोकलँडचा काही भाग जळून खाक झाला होता. यावेळी चालक तात्काळ खाली उतरल्याने त्यास कुठलीही दुखापत झालेली नाही.