सुरेशदादा जैन यांना न्युमोनियाची लागण! मुंबईला हलविले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 06:22 PM2022-12-23T18:22:00+5:302022-12-23T18:23:52+5:30

Suresh Dada Jain : सुरेशदादा यांची प्रकृती स्थिर आहे. न्युमोनियाची सुरुवात झाल्याचे निदान झाले आहे. काळजी म्हणून त्यांना मुंबईत हलविण्यात आले आहे, असे डॉ. राहुल महाजन यांनी म्हटले आहे.

pneumonia to Sureshdada Jain, Moved to Mumbai | सुरेशदादा जैन यांना न्युमोनियाची लागण! मुंबईला हलविले

सुरेशदादा जैन यांना न्युमोनियाची लागण! मुंबईला हलविले

googlenewsNext

कुंदन पाटील -

जळगाव: माजी मंत्री सुरेशदादा जैन (Suresh Dada Jain) यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सुरेशदादा यांना काही प्रमाणात न्युमोनियाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर सायंकाळी हवाई रुग्णवाहिकेने त्यांना मुंबईला हलविण्यात आले आहे.

सुरेशदादा जैन १४ डिसेंबरला जळगावात दाखल झाले होते. यानंतर ते सार्वजनिक कार्यक्रमांसह खासगी भेटींमध्ये व्यस्त होते. यातच गुरुवारी रात्री त्यांना अशक्तपणा जाणवू लागला. त्यांना रात्री दोन वाजता येथील डॉ. राहुल महाजन यांच्याकडे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सुरेशदादांना न्युमोनियाची सुरुवात झाली असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. शुक्रवारी दुपारी मुंबईहून ‘एअर ॲम्बुलन्स’ जळगावात दाखल झाली. सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास ‘एअर ॲम्बुलन्स’ने सुरेशदादा जैन यांना मुंबईत हलविण्यात आले. 

सुरेशदादा यांची प्रकृती स्थिर आहे. न्युमोनियाची सुरुवात झाल्याचे निदान झाले आहे. काळजी म्हणून त्यांना मुंबईत हलविण्यात आले आहे, असे डॉ. राहुल महाजन यांनी म्हटले आहे.

Web Title: pneumonia to Sureshdada Jain, Moved to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.