शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई येथे १६ ते २० जानेवारीदरम्यान ‘प्लास्टिव्हिजन इंडिया २०२०’ प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 21:46 IST

पत्रकार परिषद

जळगाव : प्लॅस्टिक उद्योगातील नवनवीन संशोधन, उत्पादने, बाजारपेठेची स्थिती या विषयी एकाच ठिकाणी माहिती होण्यासाठी आॅल इंडिया प्लॅस्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे ‘प्लास्टीव्हीजन इंडिया २०२०’ या प्रदर्शनाचे १६ ते २० जानेवारीदरम्यान मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. या क्षेत्रातील अडीअडचणींविषयी तज्ज्ञ उद्योजक या प्रदर्शनात मार्गदर्शनही करणार आहेत.या संदर्भात रविवारी जळगावात पत्रकार परिषद झाली, त्या वेळी ही माहिती देण्यात आली. या वेळी ‘प्लास्टीव्हीजन इंडिया २०२०’ आयोजन समितीचे अध्यक्ष कैलाश मुरारका, उपाध्यक्ष किशोर संपत, जळगावचे प्रकल्प प्रमुख रवींद्र लढ्ढा, जळगाव प्लॅस्टिक रि-प्रोसेसिंग इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष तथा प्रदर्शन समितीचे समन्वयक विनोद बियाणी, लघु उद्योग भारतीचे उपाध्यक्ष रवी फालक, सचिव समीर साने, समन्वयक संतोष इंगळे उपस्थित होते.या प्रदर्शनाविषयी माहिती देताना कैलाश मुरारका यांनी सांगितले की, अशा प्रकारचे हे अकरावे प्रदर्शन असून ते मुंबई येथे बॉम्बे एक्सिबिशन सेंटर येथे होणार आहे. तब्बल एक लाख चौरस मीटर क्षेत्रात हे प्रदर्शन होणार असून यामध्ये २५ देशातील दीड हजार उद्योजक सहभागी होणार आहे. या प्रदर्शनास युएफआय या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन सर्वोच्च समितीसह भारत सरकारने मान्यता दिली असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या प्रदर्शनासाठी देशभर ५०हून अधिक रोड आयोजित केले असून त्याद्वारे अडीच लाखाहून अधिक व्यावसायिक, पर्यटकांना आकर्षित केले जात आहे.या प्रदर्शनात कृषी, सौरऊर्जा, आॅटोमेशन, डाय आणि मोल्ड, वेस्ट मॅनेजमेंट आणि थ्री डी प्रिंटींग या क्षेत्रातील अनुभवी उद्योजक त्यांचे उत्पादन, सेवे संदर्भात मार्गदर्शन आणि सादरीकरण करणार आहेत. तसेच संस्था आणि उद्योजकांचा सत्कारही करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव