शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ; सलग दुसऱ्या वर्षी २० लाखांचा फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:12 IST

सचिन देव जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षी शासनातर्फे पंढरपूरची यात्रा स्थगित करण्यात आली होती. फक्त मोजक्याच पालख्यांना पंढरपुरात प्रवेश ...

सचिन देव

जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षी शासनातर्फे पंढरपूरची यात्रा स्थगित करण्यात आली होती. फक्त मोजक्याच पालख्यांना पंढरपुरात प्रवेश दिला होता. तर यंदाही कोरोनामुळे तशीच परिस्थिती उद्भवली आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाला कधी भेटणार, याची आस वारकऱ्यांना लागली आहे. तर दुसरीकडे याचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही झाला आहे. कोरोनामुळे पंढरपुरात इतर वारकऱ्यांना प्रवेश नसल्यामुळे, एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाला गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही २० लाखांचा फटका बसला आहे. यंदा फक्त मुक्ताईनगर येथून एसटीने एकच पालखी पंढरपूरला जाणार असल्याची माहिती महामंडळ प्रशासनातर्फे देण्यात आली.

जळगाव आगारासह जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून पंढरपूरसाठी स्वतंत्र १५ ते २० बसेस रवाना होतात; मात्र गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढीची वारी रद्द केल्यामुळे परिणामी यामुळे बससेवाही बंद ठेवण्यात आली आहे.

इन्फो :

दरवर्षी पंढरपूरसाठी सोडल्या जाणाऱ्या बसेस : दररोज ११

दररोज मिळणारे उत्पन्न : दोन ते अडीच लाख

एसटीतून दरवर्षी पंढरपूरसाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या : पाच हजार

इन्फो :

जिल्हातून दरवर्षी जाणाऱ्या पालखी

पंढरपूरसाठी जिल्ह्यातून मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखी, अमळनेर येथून प्रसाद महाराजांची पालखी, जळगावातील ग्रामदैवत श्रीराम मंदिराची संत मुक्ताई राम पालखी यासह अनेक धार्मिक संस्थानतर्फे पालखी व पायीवारी काढली जाते. साधारणत: लहान-मोठ्या १५ ते २० पालख्या पंढरपूरला जात असतात.

इन्फो :

यंदा एसटीने जाणार एकच पालखी

कोरोनामुळे शासनाने यंदाही पंढरपूर येथील यात्रोत्सव रद्द केला आहे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून फक्त मानाच्या दहा पालख्यांनाच पंढरपुरात येण्याची परवानगी दिली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखीचा समावेश आहे. ही पालखी शिवशाही बसने १८ रोजी सायंकाळी पंढरपूरकडे रवाना होणार आहे.

इन्फो :

वारकऱ्यांचेही गावी मन रमेना !

मी दरवर्षी एसटी बसने पंढरपूरला यात्रोत्सवासाठी जात असते. गेल्या अनेक वर्षापासून हा नित्यक्रम सुरू आहे; मात्र कोरोनामुळे गेल्या वर्षी जाता आले नाही आणि यंदाही जाता येणार नाही. त्यामुळे कधी पंढरपूरला जाणार, याची ओढ लागली आहे. शासनाने यंदा तरी परवानगी द्यायला हवी होती.

विमलवाई पाटे, वारकरी.

प्रकृतीअभावी पायीवारी करणे शक्य नसल्याने, मी दरवर्षी बसने पंढरपूरला जात असतो. पंढरीची वारी म्हणजे एक वेगळाच आनंद असतो; मात्र गेल्या वर्षाप्रमाणे कोरोनाने यंदाही आमच्या वारीचा आनंद हिरावून घेतला आहे. त्यामुळे विठूरायाचे दर्शन आता कधी होणार, याची आस लागून आहे.

लक्ष्मण चौधरी, वारकरी.

इन्फो :

दरवर्षी पंढरीची वारी म्हणजे एसटी महामंडळासाठी उत्पन्नाची एक पर्वणी असते. या पंढरपूरच्या यात्रोत्सवातून दरवर्षी साधारणत: २० लाखांपर्यंत उत्पन्न मिळत असते; परंतु यंदा कोरोनामुळे पंढरपूर येथील यात्रोत्सव रद्द झाल्याने महामंडळाचे यंदाही २० लाखांचे उत्पन्न बुडणार आहे.

दिलीप बंजारा, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ.