शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

परदेशामध्ये गाडी चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरणही करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:21 IST

सचिन देव लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोणत्याही देशात वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना असणे गरजेचे असते. विदेशात तर हे ...

सचिन देव

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोणत्याही देशात वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना असणे गरजेचे असते. विदेशात तर हे नियम अत्यंत कडक आहेत. मात्र, मुदत संपलेले परवान्यांचे नूतनीकरण आता आरटीओ कार्यालयातही होत असल्यामुळे नागरिकांच्या सोयीचे झाले आहे. जळगाव आरटीओ कार्यालयात दरवर्षी परवान्यांची नूतनीकरणाची संख्या मोठी आहे. मात्र, कोरोना संसर्गामुळे नूतनीकरण करणाऱ्यांची संख्या घटली असून, गेल्या पावणेदोन वर्षांत फक्त ३१ जणांनी परवान्यांचे नूतनीकरण केले आहे.

उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, परदेशात वाहने चालविण्याचे परवाने काढण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक वाहन परवाना काढण्यासाठी ज्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करावा लागतो, त्याप्रमाणे परदेशी वाहन परवान्यांच्या नूतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर नागरिकांना आरटीओ कार्यालयातर्फे तारीख दिली जाते. त्या तारखेला आरटीओ कार्यालयात जाऊन त्या नागरिकांनी मूळ पासपोर्ट, व्हिसा आणि वाहन परवाना दाखविणे गरजेचे आहे. तसेच मूळ वाहन परवान्यावरील पत्ता व पासपोर्टचा पत्ता हा एकच असणे आवश्यक आहे. यावेळी आरटीओ विभागातर्फे संबंधित नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून नूतनीकरण केले जात आहे. नूतनीकरणासाठी ५०० रुपयांचे शुल्क आकारण्यात येत आहे.

इन्फो :

असा काढावा आंतराष्ट्रीय परवाना

- परदेशात वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी आरटीओ नियमानुसार ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर, शुल्कदेखील ऑनलाईनच भरणे गरजेचे आहे. त्यानंतर शुल्क भरल्याची प्रिंट काढून आरटीओ कार्यालयात सादर करावी लागते. आरटीओ कार्यालयाकडे पासपोर्ट, व्हिसा आणि वाहन परवाना दाखवावा लागतो. मात्र, ही कागदपत्रे दाखविण्यासाठी मूळ कागदपत्रे घेऊन जाणे गरजेचे आहे.

- यानंतर आरटीओ कार्यालयाकडून या मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते. त्यानंतर संबंधित नागरिकाला एका वर्षाच्या मुदतीसाठी परवाना देण्यात येत आहे.

- एका वर्षाचा परवाना संपल्यानंतर, पुन्हा नव्याने अर्ज करून हा परवाना काढावा लागतो.

इन्फो :

कोण काढू शकतो हा परवाना

- ज्या नागरिकांकडे परदेशात राहण्याचा व्हिसा व पासपोर्ट आहे, अशा नागरिकांना आंतराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो.

- वाहन परवाना देताना आरटीओ प्रशासनातर्फे संबंधित नागरिकाचे मुळ लायसन्स पाहूनच पुढील प्रक्रिया केली जाते.

- मुळ वाहन परवान्यावरील पत्ता व पासपोर्टवरील पत्ता हा एकच असणे गरजेचे आहे. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, एका दिवसात हा वाहन परवाना दिला जातो.

इन्फो

आरटीओ कार्यालयातर्फे परदेशात गाडी चालविण्यासाठी परवान्याच्या नुतनीकरणासाठी नियमाप्रमाणे ऑनलाईन अर्ज करावा लागतो. संबंधित नागरिकांकडे अगोदरचे लायसन्स् असल्यामुळे पुन्हा त्यांची कुठलीही परीक्षा घेतली जात नाही. तसेच परवान्यासाठी नुतनीकरणाचे इतर सर्व साधारण लायसन्स् प्रमाणे ५०० रूपये शुल्क आकारले जाते.

श्याम लोही, उप प्रादेशिप परिवहन अधिकारी, जळगाव

इन्फो :

कोरोनाकाळात संख्या घटली

२०१८ - ५४

२०१९ - ५८

२०२० - २४

२०२१-७