शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

भिंतीच्या कमी उंचीमुळे वाचल्या इतर महिला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST

बिडगाव, ता. चोपडा : येथून जवळच असलेल्या वरगव्हाण येथे मंगळवारी काही महिला बांधकामाच्या ओट्यावर बसल्या असता ओट्यासह भिंत कोसळून ...

बिडगाव, ता. चोपडा : येथून जवळच असलेल्या वरगव्हाण येथे मंगळवारी काही महिला बांधकामाच्या ओट्यावर बसल्या असता ओट्यासह भिंत कोसळून एक महिला जागीच ठार झाली तर तब्बल सहा महिला गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. ही भिंत कमी उंचीची असल्यामुळे उर्वरित महिला बचावल्या, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

भिकन दमड्या पावरा यांच्या ओट्यावर महिला बसल्या व ओट्यासह घराची भिंत पडून होत्याचे नव्हते झाले. जेलीबाई परशुराम बारेला यांना जीव गमवावा लागला. ज्या ओट्यावर या महिला बसल्या होत्या, तो आठ फूट लांब व तीन फूट रुंद असूनही त्याच्यात लोखंडी सळ्यांचे लेंटर न टाकताच बांधकाम केले होते व त्यामुळेच तो कोसळला. पण, त्याच ओट्यावरील जी भिंत कोसळून महिला जागेवरच ठार झाली, ती भिंत अवघ्या तीनच फुटांची होती, अन्यथा यापेक्षाही मोठी घटना घडली असती व अनेक महिलांना जीव गमवावा लागला असता.

अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असलेल्या महिलांच्या अंगावर बांधकामाची भिंत कोसळून एक जागीच ठार तर सहा महिला जखमी झाल्याची गंभीर घटना घडली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार अनिल गावित, गटविकास अधिकारी बी. ए. कोसोदे, ग्रामविस्तार अधिकारी जे. पी. पाटील, नायब तहसीलदार महेश साळुंखे, तलाठी सरोवर तडवी यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली. मयत व जखमींच्या कुटुंबीयांना धीर दिला. मात्र गावासाठी नेमणूक असलेले ग्रामसेवक राजेश सोनार हे गावाकडे फिरकलेच नाहीत.

सरपंचांची समयसूचकता; पण, डॉक्टरांची गैरहजेरी

गावात घटना घडली, तेव्हा पावरा समाजातील सर्वच पुरुष मंडळी प्रेतयात्रेत गेले होते. मात्र या घटनेमुळे एकच धांदल उडाली. अशात येथील सरपंच भूषण पाटील यांनी समयसूचकता दाखवत जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून आपल्या मालकीच्या चारचाकी गाडीत टाकून स्वतः व सदस्य रवींद्र पाटील यांना घेऊन तत्काळ उपचारासाठी धानोरा आरोग्य केंद्रात स्वतः गाडी चालवत नेले. मात्र तेथे एकही डॉक्टर उपस्थित नसल्याने जखमींना उपचारासाठी ताटकळत राहावे लागले. शेवटी स्थानिक आरोग्य सेविका भिकूबाई बोदडे व भारती सोनवणे यांनी ‌त्यांना प्राथमिक उपचार करून जळगावला पाठवून दिले.

मी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आलोय. पंचनामाही झाला असून ज्या योजनेतून शक्य असेल, त्या योजनेनुसार मयताच्या वारसदारांना मदत देण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती तहसीलदार अनिल गावित यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.