शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक संघटनेचा 'शाळा बंद' यशस्वी

By admin | Updated: January 14, 2015 15:12 IST

राज्यासह जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षेत्र संघटना समन्वय समितीने मंगळवारी पुकारलेले एकदिवसीय 'शाळा बंद' आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा शिक्षक संघटनेने केला.

धुळे : राज्यासह जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षेत्र संघटना समन्वय समितीने मंगळवारी पुकारलेले एकदिवसीय 'शाळा बंद' आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा शिक्षक संघटनेने केला. शहरातील ८0 आणि जिल्ह्यातील ४४0 शाळा बंद राहिल्याची माहिती शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

शासनाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे संस्थाचालक व कर्मचारीविरोधी धोरण अवलंबिले आहे. त्याविरोधात शाळा बंद आंदोलन करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलनादरम्यान दिली. 
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाद्वारे, २३ ऑक्टोबर २0१३ चा शासन आदेश रद्द करून चिपळूणकर समितीप्रमाणे शिक्षकेतर कर्मचार्‍यांची पदे मंजूर करण्यात यावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे सन २00४ पासून बंद केलेले अनुदान सहाव्या वेतन आयोगावर सुरू करावे व थकबाकीसह विनाविलंब देण्यात यावे, शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण रद्द करावे, २0 नोव्हेंबर २0१३ चा तुकड्यांचा सुधारित आदेश रद्द करून पूर्वीप्रमाणेच तुकड्यांना मान्यता द्यावी, आरटीईकायद्यानुसार शिक्षकांच्या वाढीव पदांसह अंमलबजावणी व्हावी व कला-क्रीडा शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करावा, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महविद्यालयातील अनुदानास निकषप्राप्त तुकड्यांना त्वरित अनुदान द्यावे, शालार्थप्रणालीच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे शिक्षकांचे व कर्मचार्‍यांचे वेतन दरमहा नियमित होत नाही. कोणत्याही परिस्थितीतील वेतन नियमितपणे १ तारखेस होण्यासंबंधीचे आदेश देण्यात यावे व विनाअनुदानित तुकड्यांवरील विद्यार्थी संख्या सर्वबाबींसाठी ग्राह्य धरण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनाला १३ संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचा प्रतिसाद मिळाला. आंदोलनात जे.यू. ठाकरे, वि.मा. भामरे, वाल्मीक दामोदर, अँड.आय.जी. पाटील, एच.बी. पाटील, निशांत रंधे, संजय पवार, मंगलसिंग गिरासे, सुधीर जाधव, एस.बी. सूर्यवंशी, विजय बोरसे, के.बी. नांद्रे, महेश मुळे, लालाजी नांद, लोटन मोरे, डी.टी. पाटील, वाय.यू. कढरे, डी.बी. साळुंखे, विलास पाटील, देवानंद ठाकूर, आनंद पवार यांच्यासह संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. शिक्षक संघटनेने पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला कनिष्ठ महाविद्यालय संघटनेनेही पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे अजमेरा फार्मसी महाविद्यालयासह अन्य काही महाविद्यालयेही सहभागी झाल्याचे दिसून आले.