सहा महिन्यांत फक्त सपाटीकरणाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 21:13 IST2019-11-19T21:13:02+5:302019-11-19T21:13:15+5:30
जळगाव : भुसावळ ते भादली या तिसऱ्या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेने जळगाव ते शिरसोली या साडेअकरा किलोमीटवरील तिसºया ...

सहा महिन्यांत फक्त सपाटीकरणाचे काम
जळगाव : भुसावळ ते भादली या तिसऱ्या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेनेजळगाव ते शिरसोली या साडेअकरा किलोमीटवरील तिसºया लाईनचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार होते. पण सहा महिन्यात फक्त सपाटीकरणाचे काम झाले आढळून आले.
रेल्वे मंत्रालयाने तीन वर्षांपूर्वी भुसावळ ते मनमाड या तिसºया रेल्वे मार्गाला मंजुरी दिली होती. यापैकी भुसावळ रेल्वे प्रशासनाने पहिल्या टप्प्यात भुसावळ ते जळगाव या कामाला सुरुवात केली. यामध्ये सुरुवातीला भुसावळ ते भादली हे ११ किलो मीटरचे काम हाती घेतले होते. वर्षभरात हे काम पूर्ण करुन, भादली ते जळगाव या कामालाही लगेच सुरुवात करण्याचे प्रशासनाचे नियोजन होते. येथील शेतकऱ्यांना रेल्वेकडून पुरेसा मोबदला न मिळाल्यामुळे, हे कामाला विलंब झाला.
रेल्वे प्रशासनाने मे महिन्यात जळगाव ते मनमाड या तिसºया लाईनच्या कामाला सुरुवात केली आहे. या मार्गावर सुरुवातीला जळगाव ते शिरसोली दरम्यान कामाला सुरुवात करुन, डिसेंबर पर्यंत हे काम होणार होते. ते अद्यापही संथगतीने सुरु आहे.
फक्त तीन किलोमीटर पर्यंत सपाटीकरण
तिसºया लाईनच्या कामाला पिंप्राळा गेटपासून सुरुवात करण्यात आली होती. जेसीबीच्या सहाय्याने शिरसोलीपर्यंत झाडे, झुडपे तोडून जमिन सपाटीकरणासाठी रस्ता तयार करण्यात आला होता. यानंतर रोलरच्या सहाय्याने सपाटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. यामध्ये सहा महिन्यांत फक्त पिंप्राळा गेट ते मोहाडीपर्यंत सपाटीकरणाचे काम झाले असल्याचे येथील मक्तेदाराच्या कर्मचाºयांनी सांगितले.त्यामुळे या कामाला अधिक विलंब होणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या कामासंदर्भात उपमुख्य अभियंता रोहित थावरे यांच्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.