विचित्र अपघातात एक तरुणाचा मृत्यू तर दुसरा भाऊ गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 17:35 IST2021-01-18T17:34:55+5:302021-01-18T17:35:18+5:30
Accident : मंगरुळ फाट्याजवळ अपघात : ट्रक, रिक्षा, दुचाकी ट्रॅक्टरचा अपघात

विचित्र अपघातात एक तरुणाचा मृत्यू तर दुसरा भाऊ गंभीर जखमी
जळगाव - चोपडा शहरातून कमळगाव येथे जात दुचाकीने जात असलेल्या दोन भावडांचा सोमवारी दुपारी १२ वाजता मंगरुळ फाट्याजवळ विचित्र अपघात झाला. यात शुभम शिवलाल धनगर (वय १८, रा. चोपडा) याचा जागीच मृत्यू झाला तर गणेश रवींद्र धनगर (वय २०, रा. चोपडा) हा गंभीर जखमी झाला आहे. शुभम व गणेश हे दोघे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम व गणेश सोमवारी दोघेजण कामाच्या निमित्ताने दुचाकीने कमळगाव येथे निघाले होते. मंगरुळ फाट्याजवळ आल्यानंतर त्यांच्या समोरुन येणाऱ्या ट्रकने रिक्षेस धडक दिली. यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला सरकला. यानंतर दुचाकी एका ट्रॅक्टरवर आदळली. या अपघातात शुभमचा जागेवरच मृत्यू झाला. तर गणेशच्या उजवा पाय, चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. नागरीकांनी दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन शुभमला मृत घोषित केले. दहवीपर्यंत शिक्षण झालेला शुभम सध्या शेतीकाम करुन कुटुंबियांना मदत करीत होता. कुटुंबिय, नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.