One dies in ST-bike accident | एसटी-दुचाकी आपघातात एकाचा मृत्यू

एसटी-दुचाकी आपघातात एकाचा मृत्यू


एरंडोल : रविवारी सकाळी धारागीरजवळ यवतमाळ बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या भगवान किरण पाटील ( वय ६७ वर्षे ) यांचे जळगाव येथे रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री निधन झाले.
धुळे-यवतमाळ ही एसटी बस व पातरखेडे येथील सरपंच सरला भगवान पाटील व त्यांचे पती भगवान पाटील यांची दुचाकी या दोन्ही वाहनांमध्ये धारागीर गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर रविवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास अपघात झाला. त्यात सरलाबाई पाटील व भगवान पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना बेशुद्धावस्थेत जळगावला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यातील भगवान पाटील यांचा मृत्यू झाला. दीपक भगवान पाटील व महिंद्रा भगवान पाटील दोघे पोलीस कर्मचा-यांची ते वडील होत. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी दुपारी १२ वाजता पातरखेडे येथून निघणार आहे.

Web Title:  One dies in ST-bike accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.