शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

अरे देवा! सरपंचांकडेही १२ दिवसांपासून पाणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 10:27 IST

Jalgaon : पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्यामुळे गावात पाणी लॉबी जोरात आहे, तर जलवाहिनीची दुरुस्ती ग्राम पंचायतीसाठी डोकेदुखी ठरली आहे.

जळगाव : वारंवार फुटणारी जलवाहिनी, पाणीपुरवठा योजनेचा खंडित झालेला वीजपुरवठा यामुळे कुसुंबा खुर्द गावाला तब्बल १२ दिवस होऊनही पाणी मिळालेले नाही. सरपंच इंदुबाई पाटील यांचे घरही त्यासाठी अपवाद ठरले नाही. दरम्यान, पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्यामुळे गावात पाणी लॉबी जोरात आहे, तर जलवाहिनीची दुरुस्ती ग्राम पंचायतीसाठी डोकेदुखी ठरली आहे.

जळगाव एमआयडीसीला लागून कुसुंबा खुर्द आहे. औरंगाबाद महामार्गामुळे गावाची जुने व नवीन अशी विभागणी झाली आहे. ग्राम पंचायत कार्यालय, पाणीपुरवठ्याची मुख्य विहीर जुन्या गावात आहे. त्यावरून गणपतीनगर व महादेव मंदिर भागातील पाण्याची टाकी भरली जाते. नवीन गावातील तुळजाईनगर व परिसरासाठी स्वतंत्र टाकी असून, त्यात मन्यारखेडा तलावाजवळील विहिरीतून पाणी भरले जाते.

विस्तारीत भागात १२ दिवसांपासून पाणी न आल्याने संतप्त महिलांनी शनिवारी, ग्राम पंचायत कार्यालयाला कुलुप ठोकले होते. त्यामागील कारणांचा शोध घेताना माहिती मिळाली, की पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा वीजपुरवठा खंडित झालेला होता. नवीन भागात बांधकामे सुरू आहेत. तेथे साहित्य घेऊन येणारे ट्रक, ट्रॅक्टर यामुळे जलवाहिनी फुटली होती. दुरुस्तीचे काम सोमवारी, केले जाणार असले तरी इतके दिवस त्यासाठी विलंब केला गेल्यामुळे महिलांच्या संतापाच्या उद्रेक झाला.

टॅंकर व पाण्याच्या जारची लॉबी जोरातनियमित पाणी मिळत नसल्याने लोकांना महिन्यातून दोनदा टँकर आणावा लागतो. पाचशे रुपयात ४ हजार लीटर पाणी मिळते. ग्राम पंचायतीच्या विहिरींवर फिल्टरेशन प्लँट नाही. त्यामुळे जारच्या पाण्याला चांगली मागणी आहे. गावातच शुद्ध पाण्याचे जार भरून देणारे सात ते आठ प्लँट आहेत. ते जोरात चालतात. त्यांच्या रिक्षा सकाळपासून गावात घरोघरी पाण्याचे जारचे वितरण करीत असतात.

प्रत्येकाला जार, टँकर कसे परवडेल२० वर्षांपूर्वी गावात २ ते ३ हजार लोकसंख्या होती. आता ८ ते १० हजार आहे. बहुतेक जण एमआयडीसीमधील उद्योगात कामाला जातात. प्रत्येकाला टँकर, जारचा खर्च कसा परवडेल ? असा प्रश्न गावातूनच उपस्थित होत आहे.

विहिरीची स्वच्छता आवश्यकजुने गावातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीची स्वच्छता होणे आवश्यक आहे. तिच्यात सध्या वाळलेली पाने, प्लास्टीक पिशव्या पडलेल्या आहेत. त्यामुळे पाणी खराब झाले आहे. ते पिण्यालायक नाही.

२५ वर्षांपासून पाणी योजनेचे बिल थकितदीड वर्षांपूर्वी ग्राम पंचायतीची निवडणूक झाली. १७ सदस्य आहेत. फेब्रुवारी २०२१ मध्ये सरपंचपदी इंदुबाई पाटील यांची निवड झाली. त्यांचा मुलगा संतोष पाटील यांनी गावातील पाणी समस्येची माहिती दिली. वाढीव भागात दीड फूट खोलीवरच ६ इंची पाइपलाइन आहे. त्यावरून वाहने गेली, की ती वारंवार फुटते. लोकांनी काळजी घेतली पाहिजे. दीड महिन्यांपूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले. नवीन विहीर प्रस्तावित आहे. गाव वाढल्यावर समस्याही वाढल्या. २० वर्षांपूर्वी एमआयडीसीमधून पाणी आणावे लागत होते. २५ वर्षांपासून पाणी योजनेचे वीज बिल थकित आहे. त्यापैकी ४० हजार रुपये नुकतेच भरले. त्यामुळे विहिरीचा वीजपुरवठा सुरळीत होईल, असे संतोष पाटील म्हणाले.

नवीन भागात पाइपलाइन फुटल्यामुळे पाणी येत नाही. त्यामुळे महिन्यातून दोनदा टँकर आणावे लागते. या समस्येवर लवकर उपाय केला पाहिजे.- सुरेश पाटील, कुसुंबा 

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव