शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘मविप्र’ प्रकरणात अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मविप्र प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांनी खोटे व दिशाभूल करणारे पत्रव्यवहार केले असून चुकीचे आदेश काढले ...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मविप्र प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांनी खोटे व दिशाभूल करणारे पत्रव्यवहार केले असून चुकीचे आदेश काढले असल्याचे समोर येत आहेत. त्यामुळे हे सर्वच अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. तक्रारदार ॲड. विजय पाटील यांनी पुरविलेल्या माहितीचीही पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. मंत्रालयात शिक्षण व उच्च शिक्षण विभागाचे सचिव, मुख्य सचिव व इतर अशा तीन ठिकाणी, पुण्यात दोन ठिकाणी, नाशिक येथेही दोन ठिकाणी पोलिसांनी पत्रव्यवहार केला आहे.

सदाशिव पेठेतील फ्लॅटमध्ये आढळले बीएचआरचे कागदपत्रे

तानाजी भोईटे, नीलेश भोईटे व इतरांनी ॲड. विजय पाटील यांना ज्या सदाशिव पेठेतील फ्लॅटमध्ये डांबून ठेवले होते, त्याच फ्लॅटमध्ये १० जानेवारी रोजी कोथरूड पोलिसांनी पंचनामा केला असता त्यात बीएचआर व सूरज झंवर याच्याशी संबंधित कागदपत्रे आढळून आली आहेत. त्याच कागदपत्राच्या आधारावर पोलीस सूरजपर्यंत पोहोचले. हा फ्लॅट सुनील झंवरचा असल्याचे सांगितले जात आहे.

प्रशासक, निवडणूक व चॅरिटी कायद्याची माहिती

ॲड. विजय पाटील यांनी प्रशासकापासून तर सहकार कायद्याने घेण्यात आलेली निवडणूक, कार्यभार हस्तांतरण आदेश यासह इतर माहिती पोलिसांना पुरविली आहे, त्याच आधारावर संस्थेचे आर्थिक व्यवहार संचालक मंडळाशिवाय दुसऱ्या गटाच्या नावे करावे म्हणून कोणाचे पत्र होते, याची माहिती घेण्यासाठी मविप्रचे खाते असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलाही पत्र देण्यात आले आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेवर प्रशासक बसविण्यात आला होता. सहकार विभागाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करून तेथे निवडणुका घेतल्या होत्या. संस्थेची सहकार कायद्यानुसार निवडणूक केव्हा, कोणत्या कालावधीसाठी घेण्यात आली होती, याबाबत जिल्हा उपनिबंधकांनाही पत्र देण्यात आले आहे.