महिलेशी अश्लील वर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:13 IST2021-07-11T04:13:37+5:302021-07-11T04:13:37+5:30

जळगाव : महिलेला बघून अश्लील वर्तन केले म्हणून सलमान शेख साबीर (वय ३०,रा.पिंप्राळा, जळगाव) याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात ...

Obscene behavior with a woman | महिलेशी अश्लील वर्तन

महिलेशी अश्लील वर्तन

जळगाव : महिलेला बघून अश्लील वर्तन केले म्हणून सलमान शेख साबीर (वय ३०,रा.पिंप्राळा, जळगाव) याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सलमान याने ९ जुलै रोजी दुपारी दीड वाजता २७ वर्षीय महिलेसमोर उभे राहून अश्लिल हातवारे केले. हा प्रकार तिने पतीला सांगितल्यानंतर पती व मुलांना शिवीगाळ करुन धमकी दिली. या गुन्ह्याचा तपास हवालदार अनमोल पटेल करीत आहेत.

कार घेण्यासाठी महिलेचा छळ

जळगाव : कार घेण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत यासाठी सुषमा दीपक बाविस्कर (रा.नाशिक ह.मु.अयोध्या नगर) यांचा शारिरीक व मानसिक छळ केला म्हणून पतीसह चौघांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पती दीपक प्रकाश बाविस्कर, सासरे प्रकाश रामचंद्र बाविस्कर, सासु सुनंदा, दीर सचिन (सर्व रा.नाशिक) यांचा त्यात समावेश आहे. तपास हवालदार विजय पाटील करीत आहेत.

रुग्णालयातून वृध्द बेपत्ता

जळगाव : जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रुग्णालयातून बंदू हसन खान (वय ७०,रा.खंडवा, मध्य प्रदेश) हे ८ जुलै रोजी बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी पत्नी भुरीबी यांनी पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली आहे.

Web Title: Obscene behavior with a woman