आता पोलीस आपल्या दारी! , आठवड्यातून एक दिवस कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:51 IST2018-02-10T23:48:17+5:302018-02-10T23:51:01+5:30
पाच सहकाºयांचे फिरते पोलीस स्टेशन

आता पोलीस आपल्या दारी! , आठवड्यातून एक दिवस कामकाज
कुंदन पाटील/आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १० - ग्रामीण भागात आठवड्यातून एक दिवस फिरते पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कामकाज करण्याचा निर्णय गृहखात्याने घेतला आहे. या कामकाजासाठी अधिकाºयासह पाच सहकाºयांचे पथक नेमण्याचे आदेश कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात कुमार यांनी काढले आहेत.
ग्रामीण जनता छोटमोठ्या तक्रारी दाखल करण्यासाठी टाळाटाळ करतात. काहींना तालुका वा संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जाणेही अवघड असते. तर काहींना कायद्याचे ज्ञान नसल्याने तेही तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यादृष्टीने गृहखात्याने पोलीस स्टेशनपासून दूरवर असणाºया वेगवेगळ्या भागात आठवड्यातून एक दिवस फिरते पोलीस स्टेशन नेण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वतंत्र जबाबदारी
सहायक पोलीस निरीक्षक अथवा पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाºयाच्या नेतृत्वाखाली या पोलीस स्टेशनचे कामकाज होणार आहे. त्यात एक हे.कॉ., दोन पोलीस शिपाई आणि एक महिला कर्मचाºयाचा समावेश असेल.
कामकाज नोंदीची सक्ती
पोलीस वाहनाद्वारे कोपºयातील गावी पोहोचल्यावर त्याठिकाणी तात्पुरते पोलीस स्टेशनची सोय केली जाणार आहे. फिरते पोलीस स्टेशनच्या माध्यमातून अदखलपात्र गुन्हे तत्काळ दाखल करुन घेतले जाणार आहेत. दिवसभराचे कामकाज आटोपल्यावर संबंधित कामकाजाची नोंद संबंधित पोलीस स्टेशनमध्ये घेतली जाणार आहे.