शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

व्हील चेअर असूनही उपयोगात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST

जळगाव : रेल्वे प्रमाणे एसटी महामंडळ प्रशासनातर्फेही जळगाव आगारात ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवासांठी व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली ...

जळगाव : रेल्वे प्रमाणे एसटी महामंडळ प्रशासनातर्फेही जळगाव आगारात ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवासांठी व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या व्हील चेअर स्टोअर रुममध्येच धुळखात पडून असल्यामुळे अपंग व ज्येष्ठ बांधवांचे स्थानकात हाल होत आहे. स्थानकात या बांधवांची कसरत होत असून, व्हील चेअर असूनही उपयोग काय, असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

जळगाव बस स्थानकात दिव्यांग व अपंग बाधवासाठी स्टोअर रुममध्ये दोन व्हील चेअर ठेवण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी मागणी केल्यास तात्काळ व्हीलचेअर उपलब्ध करुन देण्यात येेते आणि गरज पडल्यास संबंधित दिव्यांग प्रवाशाला बसमध्ये चढण्यासाठी एका कर्मचारींही मदतीसाठी देण्यात येतो.

असे असले तरी आगार प्रशासनातर्फे दिव्यांगांसाठी किंवा ज्येष्ठांसाठी बस स्थानकात व्हील चेअर असल्याबाबत कुठेही सूचना फलक नाही. त्यामुळे प्रवाशांना अपंगासाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधांबाबत कुठलीही माहिती नाही. परिणामी या बांधवांना कसरत करतच बसमध्ये चढावे लागते. बऱ्याचवेळा व्हील चेअर नसल्यामुळे इतर प्रवासी या दिव्यांग प्रवाशांना मदत करत असतात. मात्र, शेवटी दिव्यागांचे हाल होतातच.

आगार प्रशासनाने दिव्यांग ‌ ‌व ज्येष्ठ बांधवांना उपलब्ध असणाऱ्या सोयी-सुविधांबाबत ध्वनीक्षेपणाद्वारे नेहमी जनजागृती करण्याची मागणीप्रवाशांमधून होत आहे.

इन्फो :

व्हील चेअर स्टोअर रुममध्ये

अपंग व दिव्यांग बांधवासांठी व्यवस्था करण्यात आलेल्या दोन व्हील चेअर स्टोअर रुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्या चांगल्या सुस्थितीत आहेत. मात्र, वापर नसल्यामुळे या चेअर धुळखात पडलेल्या दिसून आल्या. विशेष म्हणजे दिव्यांग बांधवानांच या चेअरबाबत कुठलीही माहिती नसल्यामुळे, या चेअरचा कुठलाही उपयोग होत नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.

इन्फो :

बस स्थानकात रॅम्पच नाही

रॅम्पवरुन दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सहजचं व्हील चेअरवरुन स्थानकात येता-जाता येते. विशेष म्हणजे रॅम्पवरुन स्व:त दिव्यांग बांधव व्हील चेअर चालवून जाऊ शकतात. मात्र, बस स्थानकात कुठेही रॅम्पच नसल्यामुळे या दिव्यांग बांधवांची चांगलीच ससेहोलपट होत आहे.

बस स्थानकात दररोज ये-जा करणाऱ्या बसेस - ६००

रोज प्रवास करणारे प्रवासी २० ते २५ हजार

स्थानकात कधी-कधी अपंग व ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये चढण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. दिव्यांग बांधवांचे तर हाल विचारूच नका, अशा वेळी आगार प्रशासनाने व्हील चेअरसह व मदतीला एक कर्मचारीही नियुक्त करणे गरजेचे आहे.

- नितीन पाटील, प्रवासी

बस स्थानकात दिव्यांग किंवा वयोवृद्ध नागरिकासांठी व्हील चेअरची सुविधा असल्याबाबत आगार प्रशासनातर्फे कुठेही फलक लावण्यात आलेला नाही. तसेच ध्वनीक्षेपकाद्वारे कुठलीही जनजागृती होत नसल्यामुळे या व्हील चेअरचा प्रवाशांना कुठलाही उपयोग होताना दिसून येत नाही.

शैलेंद्र सपकाळे, प्रवासी

बस स्थानकात प्रवाशांसाठी व्हील चेअर उपलब्ध असून मागणी केल्यावर लगेच उपलब्ध करुन देण्यात येते. तसेच प्रशासनातर्फे या सुविधांची जनजागृतींही करण्यात येत असते.

- प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार