शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

सरकारविरोधी वातावरण आहे असे कुणालाही वाटले नव्हते - एकनाथ खडसे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 20:52 IST

विधानसभा निवडणुकीत सरकारविरुध्द वातावरण कुणा आहे, असे  कुणालाही वाटले नव्हते.

जळगाव - विधानसभा निवडणुकीत सरकारविरुध्द वातावरण कुणा आहे, असे  कुणालाही वाटले नव्हते. बंडखोरांमुळे आमच्या जागा कमी झाल्या, असे  माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज येथे  सांगितले. आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी आनौपचारिक चर्चेत ते बोलत होते. कन्या रोहिणी खडसे यांचा पराभवाचे विश्लेषण पक्षाने करावे, असेही ते म्हणाले. भाजपाच्या घटलेल्या जागांबाबत विश्लेषण करताना खडसे म्हणाले की, ''गेल्यावेळी भाजपाच्या एकट्याच्या बळावर १२२ जागा आल्या होत्या. आता युती असताना १५० जागा येतील, अशी अपेक्षा होती.  विधानसभा निवडणुकीत सरकारविरुध्द वातावरण कुणाआहे, असे  कुणालाही वाटले नव्हते. बंडखोरांमुळे आमच्या जागा कमी झाल्या.'' राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधून एबी फॉर्म कोरा ठेवत असल्याचे सांगितले होते, असाही दावा त्यांनी केला.   ''बाहेरुन आलेल्यांना पक्ष न्याय देतो. तसाच न्याय आपणास मिळेल. पक्ष आपला विचार करेल. अन्यायाबाबत  केंद्रीय नेत्तृत्वाला विचारणा करु,  मात्र आपण स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नाही. प्रतिकूल परिस्थिती पक्ष उभा केला. त्याच परिश्रमाचे फळ मिळाले आहे. आयत्या पीठावर रेघोट्या मारायला पैसे लागत नाही,'' असा टोलाही त्यांनी गिरीश महाजन यांचे नाव न घेता यावेळी लगावला.  '' मी राजकारणात कधीही कुणाचा आकस धरला नाही,  १९९९ मध्ये माझे  विरोधक सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांच्यासोबत बाळासाहेबांना भेटलो होतो, असा गौप्यस्फोट  एकनाथराव खडसे यांनी यावेळी  केला.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेJalgaonजळगावMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019