सरकारविरोधी वातावरण आहे असे कुणालाही वाटले नव्हते - एकनाथ खडसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 20:52 IST2019-10-28T20:52:04+5:302019-10-28T20:52:35+5:30
विधानसभा निवडणुकीत सरकारविरुध्द वातावरण कुणा आहे, असे कुणालाही वाटले नव्हते.

सरकारविरोधी वातावरण आहे असे कुणालाही वाटले नव्हते - एकनाथ खडसे
जळगाव - विधानसभा निवडणुकीत सरकारविरुध्द वातावरण कुणा आहे, असे कुणालाही वाटले नव्हते. बंडखोरांमुळे आमच्या जागा कमी झाल्या, असे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज येथे सांगितले. आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी आनौपचारिक चर्चेत ते बोलत होते. कन्या रोहिणी खडसे यांचा पराभवाचे विश्लेषण पक्षाने करावे, असेही ते म्हणाले.
भाजपाच्या घटलेल्या जागांबाबत विश्लेषण करताना खडसे म्हणाले की, ''गेल्यावेळी भाजपाच्या एकट्याच्या बळावर १२२ जागा आल्या होत्या. आता युती असताना १५० जागा येतील, अशी अपेक्षा होती. विधानसभा निवडणुकीत सरकारविरुध्द वातावरण कुणाआहे, असे कुणालाही वाटले नव्हते. बंडखोरांमुळे आमच्या जागा कमी झाल्या.'' राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधून एबी फॉर्म कोरा ठेवत असल्याचे सांगितले होते, असाही दावा त्यांनी केला.
''बाहेरुन आलेल्यांना पक्ष न्याय देतो. तसाच न्याय आपणास मिळेल. पक्ष आपला विचार करेल. अन्यायाबाबत केंद्रीय नेत्तृत्वाला विचारणा करु, मात्र आपण स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नाही. प्रतिकूल परिस्थिती पक्ष उभा केला. त्याच परिश्रमाचे फळ मिळाले आहे. आयत्या पीठावर रेघोट्या मारायला पैसे लागत नाही,'' असा टोलाही त्यांनी गिरीश महाजन यांचे नाव न घेता यावेळी लगावला.
'' मी राजकारणात कधीही कुणाचा आकस धरला नाही, १९९९ मध्ये माझे विरोधक सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांच्यासोबत बाळासाहेबांना भेटलो होतो, असा गौप्यस्फोट एकनाथराव खडसे यांनी यावेळी केला.