शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
3
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
4
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
5
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
6
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
7
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
8
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
9
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
10
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
11
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
12
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
14
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
15
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
16
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
17
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
18
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
19
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात नववीतील मुलाची गळफास घेवून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 12:20 IST

जळगाव : वडील घरात झोपलेले असताना मागच्या खोलीमध्ये जावून हर्षल विनोद पाटील (सूर्यवंशी) वय १३ या नववीच्या विद्यार्थ्याने राहत्या ...

जळगाव : वडील घरात झोपलेले असताना मागच्या खोलीमध्ये जावून हर्षल विनोद पाटील (सूर्यवंशी) वय १३ या नववीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरातच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता खोटे नगरातील मानवसेवा शाळेजवळ घडली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घरातील एका खोलीत मंगळवारी हर्षलचे वडील विनोद हिलाल सूर्यवंशी झोपले होते. तर हर्षलची आई साधना या घराबाहेर गेलेल्या होत्या. त्या सायंकाळी सहा वाजता घरी आल्या असता हर्षल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. हा प्रकार पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. कुठलेही कारण नसताना हर्षलने टोकाचा निर्णय का घेतला हा प्रश्न कुटुंबियांसह अनेकांना पडला आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

टॅग्स :Jalgaonजळगाव