राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे यावल पोलिसांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:16 IST2021-05-27T04:16:39+5:302021-05-27T04:16:39+5:30

दीड वर्षापासून बेपत्ता असलेल्या येथील अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन येथील पोलीस ठाण्याचे फाैजदार ...

NCP honors Yaval police | राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे यावल पोलिसांचा गौरव

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे यावल पोलिसांचा गौरव

दीड वर्षापासून बेपत्ता असलेल्या येथील अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन येथील पोलीस ठाण्याचे फाैजदार विनोद खाडबहाले व सहायक फौजदार विजय पाचपोळे यांनी यशस्वीरित्या मुलीस आजोबा-आजीच्या स्वाधीन केले. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, नगरसेवक प्रा. मुकेश येवले, कामराज घारू, गणेश महाजन, धीरज महाजन, एजाज पटेल, शेख अन्सारखान शेख नबी यांनी पथकाचा गौरव केला.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, कोरोना काळात पोलीस बंधूंवर अतिरिक्त ताण असताना तातडीने एका गरीब कुटुंबातील मुलीचा शोध घेऊन तिला कुटुंबाच्या स्वाधीन केले. यात सर्व आर्थिक खर्च पोलिसांनी वैयक्तिक करून हे सामाजिक कार्य केले. यानिमित्ताने त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन समाजासमोर येत आहे.

Web Title: NCP honors Yaval police