'राष्ट्रवादीने दगड दिला तरी निवडून आणा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 06:29 IST2019-11-19T02:38:54+5:302019-11-19T06:29:39+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असो वा नसो, पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे काम निष्ठेने करावे

'Nationalist gives stone but choose' | 'राष्ट्रवादीने दगड दिला तरी निवडून आणा'

'राष्ट्रवादीने दगड दिला तरी निवडून आणा'

जळगाव : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष सत्तेत असो वा नसो, पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे काम निष्ठेने करावे, यापुढील निवडणुकीत पक्षाने जरी दगड दिला तरी त्याला निवडून आणा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोमवारी राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित महिला मेळाव्यात केले.

निवडणुकीआधी अनेक आमदार व पक्ष पदाधिकाऱ्यांनी भाजप व शिवसेनेत प्रवेश केला. आता चित्र वेगळे निर्माण झाले आहे. पक्ष सोडून गेलेले अनेक पदाधिकारी पुन्हा पक्षात यायला उत्सुक आहेत. त्यांना पक्षात घेतले जाईल मात्र, त्यांना पदे देण्यात येणार नाहीत, पक्ष संघटनेतील महत्त्वाच्या पदांवर आधी पक्षाच्या पडत्या काळात काम करणाºया पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाच विचार होईल, असेही त्या म्हणाल्या. जे पदाधिकारी काम करत नसतील त्यांची पदे काढली जातील, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: 'Nationalist gives stone but choose'