शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
2
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
3
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
4
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
5
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
6
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
7
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
8
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
9
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
10
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
11
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
12
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
13
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
14
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
15
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
16
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
17
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
18
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
19
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव

रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅकचे ‘अ’ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 2:12 PM

४ पैकी ३.२३ गुण : उत्तर महाराष्ट्र विभागातून महाविद्यालय प्रथम

जळगाव- विद्यापीठ अनुदान आयोगाचे स्वायत्त संस्थान राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषदेने नुकताच निकाल जाहीर केला आहे़ यामध्ये शहरातील जी़एच़रायसोनी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट नॅकचे ‘अ’ मानांकन प्राप्त झाले आहे़ दरम्यान, संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयात जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंटला सर्वाधिक ४ पैकी ३.२३ गुण मिळाले असून अभियांत्रिकी महाविद्यालयीन गटात उत्तर महाराष्ट्र विभागातून प्रथम स्थानावर महाविद्यालयाने आपला झेंडा रोवला आहे.नुकत्याच झालेल्या नवीन मूल्यांकनात कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटला राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषदेने एकूण सीजीपीए ४ पैकी ३.२३ असे गुण देत ‘अ’ मानांकन दिले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची नवीन नॅक पद्धतीत मोठ्या प्रमाणावर बदल झालेले असून झालेले बदल पूर्णता विद्यार्थी हिताचे आहेत. त्यामुळे झालेले बदल स्वीकारून नवीन पद्धतीचे मुल्यांकन करून महाविद्यालयाने हे यश मिळविले आहे. तसेच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या या पद्धतीला सामोरे जात उत्तर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे.२००७ साली जळगाव शहरात सुरुवात झालेल्या रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने अतिशय मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक क्षेत्रात आगेकूच केली आहे. जळगाव शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाने अग्रस्थान मिळवून संस्थेचे नाव देश पातळीवर नेऊन ठेवले आहे. संस्थेचे चेअरमन सुनील रायसोनी व कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी यांचे मार्गदर्शन मिळते त्यामुळे हे यश मिळाले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन महाविद्यालय कार्यरत राहील असा विश्वास डॉ.ए.जी.मॅथ्यु एक प्राचार्य या नात्याने मी देऊ शकतो. राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषदेने दिलेल्या ‘अ’ मानांकनामुळे आम्हाला अधिक चांगले बदल करून चांगले विद्यार्थी घडविता येतील. महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला यश मिळाल्यामुळे त्यांचे देखील अभिनंदन प्राचार्य डॉ.ए.जी.मॅथ्यु यांनी केले. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव