शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

टिपणीवर मनपा आयुक्तांची स्वाक्षरी

By admin | Updated: July 17, 2014 15:06 IST

अनधिकृतपणे शाळा चालविल्या प्रकरणी प्रशासन अधिकार्‍यांनी संबंधित संस्थेचे अध्यक्ष इक्बाल शेख यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या टिपणीवर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी बुधवारी स्वाक्षरी केली.

जळगाव : अनधिकृतपणे शाळा चालविल्या प्रकरणी प्रशासन अधिकार्‍यांनी संबंधित संस्थेचे अध्यक्ष इक्बाल शेख यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची टिपणी सोमवारी दिल्यानंतर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी बुधवारी टिपणीवर स्वाक्षरी केली. त्यामुळे इक्बाल शेख यांच्यावर आज गुन्हा दाखल होतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेहरूण भागातील गणेशपुरी परिसरात गेल्या आठ वर्षापासून इक्बाल शेख अनधिकृतपणे शाळा चालवत आहे. आरटीईनुसार शाळेला मान्यता घ्यावी, याबाबत मनपा शिक्षण मंडळातर्फे त्यांना तीनदा नोटीस पाठविण्यात आली. तरीही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. शिक्षण मंडळाने शेख यांना दिलेल्या अंतिम नोटिसीत दंडात्मक कारवाई करण्यात येईल; असे म्हटल्यानंतर त्यांनी सोमवारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. शिक्षणाधिकारी एस. डी. पाटील (प्राथमिक) यांनी शेख यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर विद्यार्थी व पालकांची दिशाभूल झाल्याचे समोर आले. त्यामुळे शिक्षणाधिकार्‍यांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे आदेश प्रशासन अधिकार्‍यांना दिले. त्याच दिवशी प्रशासन अधिकारी महाजन यांनी आयुक्तांना टिपणी सादर केली. या टिपणीवर आयुक्तांनी बुधवारी सही केली आहे. दरम्यान, मंगळवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस कामानिमित्त बाहेर असल्यामुळे प्रशासन अधिकार्‍यांनी उपायुक्त अविनाश गांगुर्डे यांच्याकडे टिपणी सादर केली होती. मात्र त्यावर सही होऊ शकली नव्हती.

-----------------

फौजदारी गुन्हा दाखल करणे माझ्या अधिकारात नाही. मी टिपणी आयुक्तांना दिली होती. त्यांनी या टिपणीवर सही केली आहे. आयुक्त किंवा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संस्थाचालक शेख यांच्यावर गुन्हा दाखल करू शकतात.  - व्ही. एस. महाजन, प्रशासन अधिकारी, मनपा शिक्षण मंडळ