शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेसाठीच्या हालचाली पुन्हा मंदावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:20 IST

भाजपची सर्वपक्षीय तोडग्यासह स्वबळाचीही तयारी : ‘त्या’ सहा जागांचा तिढा कायम राहण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा ...

भाजपची सर्वपक्षीय तोडग्यासह स्वबळाचीही तयारी : ‘त्या’ सहा जागांचा तिढा कायम राहण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा बँकेसाठी मतदार यादी अंतिम करण्याचा प्रक्रियेला सुरुवात झाली असून, २५ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्याआधी जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनेल तयार करण्याचा हालचाली सुरू होत्या. त्यासाठी बैठकही पार पडली व जागा वाटपासाठी सर्वपक्षीय नेत्यांची समिती देखील तयार झाली आहे. मात्र, समिती तयार झाल्यानंतर जिल्हा बँकेसाठीच्या हालचाली पुन्हा मंदावल्या असून, भाजपकडून यासाठी प्रतिसाद दिला जात नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पहिल्या बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निर्णय घेण्यासाठी चारही पक्षांच्या आठ सदस्यांचा समावेश असलेली कोअर कमिटी स्थापन करण्यात आली होती. कमिटीत शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर आणि काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी व ॲड. संदीप पाटील यांचा समावेश आहे. मात्र, समिती स्थापन झाल्यापासून समिती सदस्यांची आतापर्यंत एकही बैठक झालेली नाही.

खडसे राजस्थानहून आल्यावर बैठक

माजी मंत्री एकनाथ खडसे हे उपचारासाठी राजस्थानला गेले असल्याने त्यामुळे ही बैठक रखडल्याचे कारण पुढे केले जात आहे. खडसे हे राजस्थानला गेले असल्याने समिती सदस्यांची बैठक होऊ शकली नव्हती. मात्र, आठवडाभरात सर्वपक्षीय समिती सदस्यांची बैठक होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्याठिकाणची पाहणी, शेतकऱ्यांचे प्रश्न, नुकसानीचा आढावा घेणे या कामांना अधिक प्राधान्य देणे गरजेचे होते. त्यामुळे ही बैठक होऊ शकली नव्हती, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

सहा जागांमुळे डोकेदुखी वाढणार

जिल्हा बँकेसाठी सोसायटी मतदारसंघाव्यतिरिक्त असलेल्या इतर सहा मतदारसंघांतील जागांवरून सर्वपक्षीय नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. या सहा जागांमध्ये २ महिला, १ ओबीसी, १ एनटी, १ एसटी व १ इतर सहकारी संस्था मतदारसंघाचा समावेश आहे. सोसायटी मतदारसंघातील १५ जागांवर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले तरी सहा जागांबाबत होणे कठीण असल्याने या सहा जागांवरून सर्वपक्षीय पॅनेल फिसकटण्याचीही शक्यता आहे. सद्य:स्थितीत ६ जागांपैकी ३ जागा भाजप, २ राष्ट्रवादी, तर १ शिवसेनेकडे आहे. अशा परिस्थितीत समान वाटपाचा निर्णय झाल्यास भाजपला एक जागा सेनेसाठी सोडावी लागणार आहे. मात्र, भाजप गेल्यावेळेप्रमाणेच तीन जागांसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपची स्वबळाची तयारी सुरू ?

एकीकडे सर्वपक्षीय पॅनेलची चर्चा सुरू असताना व त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची समिती स्थापन केल्यावर देखील भाजपने दुसरीकडे स्वबळाचीही तयारी सुरू केली आहे. सर्वपक्षीय पॅनेलमुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड होण्याची शक्यता असल्याने भाजपमध्येच नाराजी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही नाराजी वाढू नये म्हणून स्वबळाचीही तयारी भाजपने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागा वाटपामध्ये भाजप जास्त जागांसाठी आग्रही असून, खडसे कुटुंबीयांमधून एकच उमेदवार देण्याबाबत देखील भाजपची मागणी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.