आई मामांकडे गेली, मुलीने घरात ओढणीने घेतला गळफास; नशिराबाद येथील घटना
By Ajay.patil | Updated: February 1, 2024 18:40 IST2024-02-01T18:40:20+5:302024-02-01T18:40:39+5:30
आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

आई मामांकडे गेली, मुलीने घरात ओढणीने घेतला गळफास; नशिराबाद येथील घटना
जळगाव: तालुक्यातील नशिराबाद येथील १७ वर्षीय मुलीने गुरुवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तंजीला बी.शेख अन्सार (वय.१७) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तंजीला आपल्या आई, वडिल व लहान बहिणीसोबत नशिराबाद येथील मणियार मोहल्ल्यात राहत होती. वडील शेख अन्सार शेख शकील हे हातमजुरीचा व्यवसाय करतात. तर आई गृहीणी आहेत. गुरुवारी दुपारी वडील हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तर आई दुपारी २ वाजेच्या सुमारास लहान बहिणीला घेऊन, गावातच राहत असलेल्या मामाकडे गेली होती. घरात कोणी नसल्याने तंजीलाने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी ३ वाजता आई घरी आल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद असल्याने, खिडकीतून डोकाऊन पाहताच आईला तंजीलाचा गळफास घेतलेला दिसला. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून तंजीलाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले, याठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषीत केले. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.